१३८ वर्षांचा इतिहास सांगणारी रत्नागिरीतील ब्रिटीशकालीन वास्तू म्हणजे येथील प्रादेशिक मनोरुग्णालयंहे सांगली जयसिंगपूर येथे हलविण्याचा घाट घातला आहे. त्याचे अध्यादेशही निघाले आहेत. त्या विरोधात विविध सामाजिक संघटनांनी मनोरुग्णालयाबाहेर निदर्शने केली. यावेळी अॅड. अश्विनी आगाशे, राजेंद्र . आयरे, माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर, सामाजिक कार्यकर्ते युयुत्सू आर्ते, महेंद्र गुळेकर, अरविंद मालाडकर, रुपाली सावंत आदींसह सामाजिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी हे प्रादेशिक मनोरुग्णालय जयसिंगपूरला हलविण्यास विरोध दर्शविण्यात आला. तसेच शासनाचा निषेध नोंदविण्यात आला. रत्नागिरी येथील प्रादेशिक मनोरुग्णाल जयसिंगपूर येथे हलविण्यात येत आहे. त्याबाबत तमाम रत्नागिरीतील नागरिकांतर्फे निषेध व्यक्त करण्यात आला.
१३८ वर्षे पूर्ण – रत्नागिरीतील प्रादेशिक मनोरुग्णालय हे पाच जिल्ह्यांसाठी असून त्यांची स्थापना १८८६ साली झाली आहे. या रुग्णालयाला १३८ वर्षे पूर्ण झाली आहेत. या मनोरूग्णालयाचे अतिशय कौतुकास्पद काम असून संपूर्ण महाराष्ट्रातील ते सुसज्ज असे एकमेव मनोरुग्णालय आहे. हे मनोरुग्णालय एकूण १४ एकर अशा विस्तीर्ण जागेत पसरलेले असून ७ एकर जागेला ग्रीन झोन आहे व ७ एकर जागेत बांधकामे आहेत. या मनोरुग्णालयातील स्टाफ ‘प्रशिक्षित असून डॉक्टरही खूप चांगले आहेत. मनोरूग्णालयात येणाऱ्या रुग्णांच्या मनाचा विचार करून इथला स्टाफ त्यांना उत्तम सेवा देतो, त्यांची काळजी घेतो.
या रुग्णालयात आजपर्यंत’ सिंधुदूर्ग, रायगड व अन्य जिल्ह्यातील अनेक मनोरुग्णांनी उपचार घेतले असून ते बरेही झाले आहेत. अशी कौतुकास्पद परंपरा असलेल्या व अनेक मनोरूग्ण लाभ घेत असलेले हे मनोरुग्णालय जयसिंगपूरला हलविण्याचा अट्टाहास काही राजकीय मंडळींनी व पुढाऱ्यांनी सन २०२२ ते सन २०२४ या तीन वर्षांच्या कालावधीत चालवला असल्याचे कागदपत्रांवरून दिसून येते. त्यासाठी ते वेगवेगळी खोटी कागदपत्रे रंगवून हे मनोरूग्णालय अन्यत्र हलविण्याच्या आहेत विचारात
जागा घशात घालण्याचा डाव – वास्तविक उत्तम स्थितीत चालू असलेले व सुसज्ज असे मनोरूग्णालय हलविण्यामागे मनोरुग्णालयाचे म ालकीची असलेली १४ एकर जागा घशात घालण्याचा डाव राजकीय मंडळींचा दिसत आहे असा आरोप निदर्शकांनी पत्रकारांशी बोलताना केला. अॅड. अश्विनी आगाशे यांनी सांगितले की, याबाबत आम्ही माहिती घेतली असता मनोरुग्णालयाचा काही भाग सिव्हील हॉस्पिटलला देण्यात येणार आहे. आजही सिव्हील हॉस्पिटलची परिस्थिती खूप वाईट आहे. हे राजकारणी अनेकदा अनेक उद्योग करीत असल्याने डॉक्टरही सिव्हील हॉस्पिटल मध्ये येण्यास तयार नाहीत. तर सिव्हील हॉस्पिटलसाठी संपूर्ण मनोरुग्णालय जयसिंगपूर सारख्या ठिकाणी हलविणे म्हणजेच रत्नागिरीकरांवर फार मोठा अन्याय होणार आहे.