28.5 C
Ratnagiri
Wednesday, November 6, 2024

Royal Enfield ची पहिली इलेक्ट्रिक बाईक समोर आली आहे

रॉयल एनफिल्डने इटलीतील मिलान येथे सुरू असलेल्या...

‘रामायण’मध्ये रणबीर कपूर करणार डबल धमाका…

रणबीर कपूर आणि सई पल्लवी स्टारर 'रामायण'...

नीलेश राणेंकडून जैतापकरांची समजूत, थेट हेलिकॉप्टरने धाडले गुहागरात

उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दिवसापर्यंत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना...
HomeMaharashtraऐन निवडणुकीत त्यागाची आठवण करून देताच शिंदेंनीही सुनावले

ऐन निवडणुकीत त्यागाची आठवण करून देताच शिंदेंनीही सुनावले

शिंदेंच्या शिवसेनेलाही १०० पेक्षा जास्त जागा हव्या आहेत.

विधानसभा निवडणुकांचे बिगुल मंगळवारी वाजले. राज्यात सत्तेवर असलेल्या महायुतीच्या जागा वाटपाची बोलणी अजूनही सुरुच आहेत. भारतीय जनता पक्ष कोणत्याही परिस्थितीत १५५ ते १६० जागा लढण्यावर ठाम आहे तर शिंदेंच्या शिवसेनेलाही १०० पेक्षा जास्त जागा हव्या आहेत. अनेक जागांबाबत रस्सीखेच सुरु आहे. असे असताना भाजपने दबाव तंत्राचा वापर सुरु करताच शिंदे गटाच्या आमदारांमध्ये नाराजी पसरली आहे.

मुख्यमंत्री कोण? – जागा वाटपाच्यावेळी पुन्हा सत्ता आल्यावरही एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री व्हावेत अशी शिवसेनेची मागणी आहे. मात्र भाजप ही मागणी पूर्ण करताना दिसत नाही. ज्याच्या जागा जास्त त्याचा मुख्यमंत्री हे सूत्र महाविकास आघाडीमध्ये आहे. तेच महायुतीत लागू करा असाही काहींचा आग्रह होता. मात्र त्यालाही भाजप तयार नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जाते.

त्यागाची आठवण ठेवा! – शिंदे गट जागा वाटपात पडते घेण्यास तयार नसल्याने वादग्रस्त विषय अमित शहांपर्यंत पोहोचला. अमित शहा मध्यस्थी करुन तोडगा काढतील असे बोलले जात होते. मात्र त्यांनी भाजपने केलेल्या त्यागाची आठवण त्यांनी शिवसेनेला करुन दिली. त्यामुळे आता नवा वाद सुरु झाला आहे.

काय म्हणाले अमित शहा ? – जागा वाटप आणि मुख्यमंत्री प्रदाबाबतच्या वादावर अमित शहांनी शिंदे गटाला चांगलेच सुनावले. आमचे १०५ आमदार असतानाही तुम्हाला आम्ही मुख्यमंत्री केलं, तुमच्यासाठी आमच्या माणसांना त्याग करावा लागला त्याची आठवण ठेवा असे त्यांनी शिंदेंना सांगितल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे. तेव्हा शिंदेंनी आता मोठे मन करावे आणि भाजपला झुकते माप द्यावे असे सांगितल्याचे कळते.

शिवसेना आमदार संतापले – अमित शहांनी त्यागाची आठवण करुन दिल्याने शिंदे गटाचे आमदारही संतापले आहेत. एकनाथ शिंदेंना त्याग करण्याची जाणीव ठेवावी असे सांगणाऱ्या अमित शहा आणि भाजपला आमदारांनी चांगलेच सुनावले आहे. आम्ही धाडसी आणि क्रांतीकारक असा निर्णय घेतला. जर आम्ही उठाव केला नसता तर तुमचे सरकारच आले नसते, मग त्याग कुठला? असा सवाल शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी या संदर्भात प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी प्रश्न विचारला असता उपस्थित केला आहे.

मुख्यमंत्री पद दिल्याने सरकार आले! – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार पडण्यामागे एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी केलेला उठाव कारणीभूत आहे. हे धाडसी पाऊल आम्ही उचलले नसते तर भाजप आज सत्तेवर नसता. आमच्या साहसामुळे सरकार आले तेव्हा मुख्यमंत्री पद दिलेलें म्हणजे काही उपकार केले नाही अशी तीव्र प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केली. सत्तांतराच्या काळातील घटनाक्रम लक्षात घ्या आणि नंतर भूमिका मांडा असा सल्लादेखील शिंदे गटातील अनेक आमदारांनी भाजपला दिला आहे.

तर भाजपचे नेते जेलमध्ये असते ! – एकनाथ शिंदे यांनी शिवसेना आमदारांसह धाडसी पाऊल उचलून उठाव केला. तसं झालं नसतं तर भाजपा आमदार विरोधी बाकावर बसले असते. याचबरोबर महाविकास आघाडीच्या नेत्यांनी भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांना जेलमध्ये टाकण्याची पूर्ण तयारी केली होती हे लक्षात घ्या. शिंदेंमुळे भाजपच्या नेत्यांची जेलची वारी टळली आहे हे अमित शहांच्या मताला दुजोरा देणारे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही लक्षात घ्यावे असेही त्यांनी सांगितले आहे.

फडणवीसांची सावध भूमिका – शिंदेंना त्यागाची जाणीव करुन देत मोठं मन करण्याची सूचना अमित शहांनी केल्याचे वृत्त अनेक प्रसार वाहिन्यांवरुन प्रसिद्ध होताच राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. शिवसेनेच्या आमदारांनी जर असे असेल तर असे म्हणत चोख उत्तर दिले. त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी मात्र सावध भूमिका घेत असे काही झालेले नाही असे सांगत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधीशी यावर अधिक भाष्य टाळले.

RELATED ARTICLES

Most Popular