27.6 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

सागरी सुरक्षारक्षक यंत्रणा रामभरोसे, मच्छीमारांकडूनही नाराजी

सागरी किनाऱ्याची सुरक्षा ही अत्यंत संवेदनशील आणि...

परताव्याच्या प्रतीक्षेत ३६ हजार ४६८ बागायतदार…

वातावरणातील बदलांमुळे कोकणातील आंबा-काजू बागायतदारांचे होणारे ...

दापोलीत ३५ इलेक्ट्रिक वातानुकूलित बसेस

रस्त्यात बंद पडणाऱ्या जुन्या बसेस, एसीचा अभाव,...
HomeRatnagiriखोल समुद्रात वाहत जाणाऱ्या २ पर्यटकांना शिताफीने बचावले

खोल समुद्रात वाहत जाणाऱ्या २ पर्यटकांना शिताफीने बचावले

मात्र त्याच वेळी किनाऱ्यावर असलेल्या मोरया स्पोर्टस्च्या एका जेट स्की चालकाने प्रसंगावधान राखत त्या दोघांना सुरक्षितरित्या पुन्हा किनाऱ्याकडे आणले.

गणपतीपुळे येथील समुद्रात खोल पाण्यात पोहत गेलेला व अडकलेल्या दोघा पर्यटकांना मोरया स्पोर्टसच्या जेट स्की चालकांनी वेळीच माघारी आणल्यामुळे दुर्घटना टळली. हा प्रकार गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास गणपतीपुळे किनारी घडला.उन्हाळी सुट्ट्यांमुळे गणपतीपुळेसह जिल्ह्यातील किनारी भागामध्ये पर्यटकांचा राबता वाढला आहे. गणपती मंदिरामध्येदर्शन घेतल्या नंतर पर्यटकांची पावले आपसूकच समुद्रस्नानाच्या ओढीने किनाऱ्याकडे धाव घेतात. त्यांच्या सुरक्षेसाठी किनाऱ्यावर जीवरक्षकांची नेमणूक करण्यात आली आहे; मात्र गेले दोन दिवस वातावरण बदलामुळे लाटांचा वेग वाढला असून पाण्याला प्रचंड करंट आहे.

गुरुवारी सकाळी बेळगाव येथून आलेल्या पर्यटकांच्या एका कुटूंबातील दोन तरुण पोहण्यासाठी समुद्रात उतरले होते. ते मंदिरापासून शंभर मीटर अंतरावरील परिसरात पोहण्याचा आनंद घेत होते. पोहताना लाटांबरोबर ते खोल समुद्राकडे जाऊ लागले. पाणी वेगाने किनाऱ्यावर येऊन आत मध्ये जात असल्याने अनेक पर्यटक सुरक्षित ठिकाणी पोहत होते. बेळगावमधील ते दोघे पर्यटक लाटांबरोबर खोल समुद्राकडे जाऊ लागले. ही बाब किनाऱ्यावरील जीवरक्षक अक्षय माने, अनिकेत चव्हाण, विक्रम राजवाडकर, आशिष मोने हे सतर्क झाले. दुर्घटना टाळण्यासाठी ते समुद्राच्या दिशेने धावले, मात्र त्याच वेळी किनाऱ्यावर असलेल्या मोरया स्पोर्ट्सच्या एका जेट स्की चालकाने प्रसंगावधान राखत त्या दोघांना सुरक्षितरित्या पुन्हा किनाऱ्याकडे आणले. वेळीच त्या दोघांना बाहेर काढल्यामुळे पुढील प्रसंग टळला.

वारंवार सूचना देऊन देखील समुद्राचे सौंदर्य आणि पाण्यात जाण्याचा मोह पर्यटकांना आवारात नसल्याने अशा प्रकारच्या दुर्घटना घडतात. कित्येकदा जीव रक्षक आणि स्थानिक व्यापारी देखील पर्यटकांना भरती ओहोटीच्या वेळा सांगत असतात. परंतु, सांगितलेल्या गोष्टीकडे केलेल्या दुर्लक्षामुळे असे अपघात घडून येतात. केवळ नशीब बलवत्तर म्हणून या दोघांचे प्राण वाचले.

RELATED ARTICLES

Most Popular