22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRajapurरिफायनरी प्रकल्प लवकर मार्गी लावा विनायक कदम

रिफायनरी प्रकल्प लवकर मार्गी लावा विनायक कदम

स्थानिक शेतकरी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी खासदार राणे यांची भेट घेणार आहेत.

तालुक्यातील बारसू येथे प्रस्तावित असलेला ग्रीन रिफायनरी प्रकल्प लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणी बारसू येथील शेतकरी विनायक कदम यांनी केली आहे. हा प्रकल्प खासदार नारायण राणे मार्गी लावू शकतात, याची सर्वांना खात्री आहे. त्यासाठी लवकरच स्थानिक शेतकऱ्यांचे शिष्टमंडळ घेऊन राणे यांची भेट घेणार असल्याचे कदम यांनी सांगितले. रिफायनरी प्रकल्पाविषयी पत्रकारांशी बोलताना कदम म्हणाले, प्रकल्पाला विरोध असल्याचे केवळ भासवले जात आहे.

प्रत्यक्षात किती आणि कुणाचा विरोध आहे, हे तपासले पाहिजे. ज्यांनी या प्रकल्पाला विरोध केला ते आता कुठे दिसत नाहीत. कधी विरोध करायचा तर कधी पाठिंबा द्यायचा, अशी दुटप्पी भूमिका स्थानिक आमदार घेत आहेत. विकासासाठी इथल्या बेरोजगारांना रोजगार देण्यासाठी काहीच केले नाही. कायमच भावनिक राजकारण करून पोळी भाजली. स्थानिक जनतेला हा प्रकल्प हवा आहे. या प्रकल्पामुळे राजापूरचे मागासलेपण दूर होईल. स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळेल.

त्यामुळे आता स्थानिक शेतकरी या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी खासदार राणे यांची भेट घेणार आहेत. त्यासाठी प्रसंगी दिल्लीत जावे लागले व केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांची भेट घ्यावी लागली तरीही खासदार राणे यांच्या माध्यमातून घेणार आहोत. एमआयडीसाठी जमीन अधिग्रहण करून आणि एमआयडीसी येणार येणार, असे गाजर दाखवून काही उपयोग नाही. त्यासाठी कृती आवश्यक आहे. त्यामुळे ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणे आवश्यक आहे, असेही कदम यांनी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular