26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeMaharashtraअर्थमंत्र्यांनी घोषणा केली आणि सोनं झालं स्वस्त...

अर्थमंत्र्यांनी घोषणा केली आणि सोनं झालं स्वस्त…

सोन्याने आणि चांदीचे दर कमी झाल्यामुळे त्याचा' ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर केला. केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात सोने आणि चांदीच्या सीमा शुल्कात मोठी घट केली आहे. केंद्र सरकारने १५ टक्क्यांवर असलेले सीमा शुल्क ६ टक्क्यांवर आणले आहे. त्यामुळे बुधवारपासूनच सोने-चांदीच्या भावांमध्ये मोठी घसरण झाली आहे. सोने-चांदीचे सीमा शुल्क कमी झाल्याने सर्वसामान्यांना मोठा फायदा आणि दिलासा मिळणार आहे. विशेष म्हणजे देशाच्या अर्थसंकल्पात सोन्या आणि चांदीवरील कस्टम ड्युटी ६ टक्क्‌यांनी कमी केल्याची घोषणा झाल्यामुळे जळगावच्या सुवर्ण नगरीत सोन्या-चांदीचे दर घरसले आहेत.

जळगावच्या सराफ बाजारात सोन्याच्या दरात ३ हजार रुपयांनी तर चांदीच्या दरातही ३ हजार रुपयांनी घसरण झाली आहे. सोन्याचे दर ७३ हजार रुपयांवरून ७० हजार रुपयांवर आले आहेत. तर चांदीचे दर हे ९० हजार रुपयांवरून ८७ हजार रुपयांवर पोहोचले आहेत. गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दारात चढ-उतार होत असल्याने सराफ व्यावसायिक तसेच ग्राहक संभ्रमात होते. मात्र आता तब्बल ३ हजार रुपयांनी सोन्याने आणि चांदीचे दर कमी झाल्यामुळे त्याचा’ ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

आगामी काळात सण – उत्सव असल्याने सोने आणि चांदीच्या खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी होण्याची शक्यता सराफ व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे. देशाचा अर्थसंकल्पात सोने-चांदीवरील कस्टम ड्युटी कमी करण्यात आल्याची घोषणा झाल्याने त्यांचा जळगावच्या सराफ बाजारात परिणाम झाला आहे. जळगावच्या सराफ बाजारात सोने-चांदी खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांकडून आनंद व्यक्त केला जातोय.

मुंबइचे दर किती ? – मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा दर काल प्रती १० ग्रॅम किंवा १ तोळे सोन्याचा दर हा ६७ हजार ७०० रुपये इतका होता. पण आता हाच दर ६४ हजार ९५० रुपयांवर आला आहे. विशेष म्हणजे मुंबईत काल १ ग्रॅम सोन्याचा दर हा ६७७० रुपये इतका होता. पण आज तोच दर ६४९५ रुपये इतका झाला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर हा कालपर्यंत ७३८५ रुपये प्रतीग्रॅम होता. तोच दर आझ ७०८६ वर आला आहे. तर १० ग्रॅम २४ कॅरेट सोन्याचा सोमवारचा दर हा ७३,८५० इतका होता. आता तोच दर ७०,८६० वर आला आहे. जवळपास २९९० रुपयांची घसरण झालेली बघायला मिळत आहे..

दिल्लीतले दर किती? – देशाची राजधानी दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा दर हा सोमवारी १ ग्रॅम सोने हे ६७८५ रुपये इतकं होतं. पण त्याची किंमत मंगळवारी ६५१० इतकी झाली आहे. तर १ तोळे सोन्याची किंमत ही ६७,८५० इतकी होती, तीच किंमत आज ६५,१०० रुपयांवर आली आहे. तर २४ कॅरेट सोन्याचा दर हा काल प्रती. तोळे ७४ हजार रुपये इतका होता. हाच दर आज ७१,०१० वर आला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular