29.9 C
Ratnagiri
Thursday, November 21, 2024

अपंगांच्या हक्काच्या निधीचे वाटप नाही

दिव्यांगांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी ४०...

फुटबॉलचा सर्वात मोठा स्टार पुढच्या वर्षी भारतात येणार…

संपूर्ण जगाला फुटबॉलचे वेड लागले आहे. भारतातही...

गणपतीपुळे किनाऱ्यावरील ‘त्या’ भिंतींना धोका

तालुक्यातील श्रीक्षेत्र गणपतीपुळे किनाऱ्यावरील मंदिर परिसराला जोडून...
HomeKokanखुशखबर! महामार्गावरील कशेडी बोगदा या अखेरीस वाहतूकीस खुला

खुशखबर! महामार्गावरील कशेडी बोगदा या अखेरीस वाहतूकीस खुला

मुंबई-गोवा मार्गावरून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे. कोकणचा समृद्धी महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात मोठा कशेडी बोगदा येत्या मे महिन्याच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक कोंडी व खड्ड्यांची समस्या या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी काही नवीन नाही. मात्र या मार्गावरून प्रवास. करणाऱ्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी आहे.

कोकणचा समृद्धी महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मुंबई-गोवा महामार्गावरील सर्वात मोठा कशेडी बोगदा येत्या मे महिन्याच्या अखेरीस वाहतुकीसाठी खुला होणार आहे.कशेडी घाटात दोन बोगद्यांचे काम सुरू असून एकाचे काम ८० टक्के पूर्ण झाले दुसऱ्या बोगद्याचे काम पूर्ण झाले असून हा बोगदा वाहतुकीस खुला करण्यात येणार आहे, अशी माहिती महामार्ग बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधील कशेडी ते रायगड जिल्ह्यातल्यापोलादपूर येथील भोगाव इथपर्यंत कशेडी बोगदा हा २ किलोमीटरचा असून एक तासाचे अंतर अवघ्या १० मिनिटात पार होणार आहे. नोव्हेंबर २०१८ मध्ये या बोगद्याच्या कामाला सुरूवात झाली होती.

या प्रकल्पासाठी ४४१ कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. हा बोगदा खुला झाल्यास कशेडी घाटाला पर्याय म्हणून या मार्गावरून वाहतूक होईल. मुंबई-गोवा महामार्गावरील रायगड आणि रत्नागिरीला जोडणाऱ्या कशेडी घाटाला हा बोगदा पर्याय ठरणार आहे. कशेडी बोगद्यातून तीन पदरी महामार्ग जाणार असून अशा दोन बोगद्यांचे काम सुरू करण्यात आले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular