26.4 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeRajapurराजापुरातील धान्य दुकानांना कुलूप, मोर्चा काढण्याचा इशारा

राजापुरातील धान्य दुकानांना कुलूप, मोर्चा काढण्याचा इशारा

ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर्स फेडरेशनने हे आंदोलन पुकारले आहे.

शासनाचे विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रास्त भाव दुकानदारांनी संप पुकारला आहे. त्यामध्ये तालुक्यातील ९९ दुकानदारांनी सहभाग घेतल्याने दुकानांना कुलूप लागले आहे. त्यामुळे तालुक्यातील रेशनिंग धान्य वितरण व्यवस्था ठप्प झाली आहे. शासनाने मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय न घेतल्यास मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला आहे. याबाबतचे निवेदन राजापूर तालुका रास्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने अध्यक्ष महेश नकाशे, उपाध्यक्ष दत्तप्रसाद राजाध्यक्ष, नरेश शेलार, सचिव दीपक जाधव, खजिनदार हेमंत उपळकर, सहचिटणीस महेंद्र मावळकर, सहखजिनदार विशाल पेडणेकर, सल्लागार उल्हास प्रभूदेसाई, पद्माकर कशाळकर आणि रेशन दुकानदारांनी निवासी नायब तहसीलदार दीपाली पंडित, पुरवठा अधिकारी दीपा निटुरे यांनी स्वीकारले.

ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डीलर्स फेडरेशनने हे आंदोलन पुकारले आहे. त्यामध्ये राजापूर तालुका रास्त धान्य दुकानदार संघटना जिल्हा संघटनेच्या नेतृत्वाखाली सहभागी झाली आहे. त्यानुसार तालुक्यातील सर्व रास्त धान्य दुकानदारांनी दुकाने बंद ठेवून संपामध्ये सहभागी झाले आहेत. त्यामुळे तालुक्यातील रास्त धान्य वितरण ठप्प झाले आहे. दरम्यान, निवेदनाद्वारे जुन्या २ जी पॉस मशिन बदलून ४ जी मशिन द्याव्यात, रेशनमधील कालबाह्य नियम बदलावेत, मासिक इन्कम गॅरंटी ५० हजारांची मिळावी अन् सुरक्षा अधिनियमातील लाभार्थी पात्रता निष्कर्ष त्वरित बदलावेत, आनंदाचा शिधा योजना कायमस्वरूपी राबवावी, त्यात पामतेलाऐवजी सोयाबीन, सूर्यफूल तेल द्यावे.

नाफेडतर्फे भारत ब्रॅण्ड कांदा, तूरडाळ, चणाडाळ, मूगडाळ आदी साहित्य मिळावे. ज्वारी, बाजरी, वरी, राजगिरा या तृणधान्याचे वाटप रेशनवर करावे. आधार सप्लाय चेन मॅनेजमेंट धान्याची उचल वेळेत करावी. या वितरणासाठी धान्य उपलब्ध करावे. हँडलिंग लॉस एक क्विंटल धान्यास एक किलो मिळावा, आदी मागण्या रास्त धान्य दुकानदारांनी शासनाकडे केल्या आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular