26.9 C
Ratnagiri
Wednesday, July 17, 2024

रत्नागिरी मिरकरवाडा मच्छीमार्केटची दुरवस्था

शहराजवळील मिरकरवाडा येथील मच्छीमार्केटची अवस्था दयनीय झाली...

घनकचरा प्रकल्पाला ५ एकर जागा – उदय सामंत

रत्नागिरी पालिकेचा घनकचरा प्रकल्पाच्या जागेचा प्रश्न अखेर...

परशुरामनगर भागात पुराची नवी समस्या, महामार्ग विभागाचे दुर्लक्ष

ओझरवाडी डोंगरातील पावसाचे पाणी महामार्गच्या गटारांमध्ये न...
HomeSindhudurgदादांचा काय होणार? मालवणी मुलखात मोठी उत्सुकता

दादांचा काय होणार? मालवणी मुलखात मोठी उत्सुकता

मुलखात गजालींना जोर चढला आहे.

लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल ४ दिवसांवर येऊन ठेपल्याने मालवणी मुलखात मोठी उत्सुकता लागली आहे. कोकणाचा ढाण्या वाघ नारायण राणे तथा दादांचं काय होणार? अशी चर्चा मालवणी मुलखात समर्थकांत ऐकायला मिळत आहे. मुलखात गजालींना जोर चढला आहे. मालवणी मुलखातल्या सर्व बाजारपेठेत लोकसभेचा निकाल काय लागणार? यावर ग़जाली रंगलेल्या ऐकायला मिळत आहेत. हॉटेलातील बाकड्यावर बसून चमचमीत गरम-गरम मासळीचे जेवण आणि खमंग सोलकढीचे भुरके मारीत मारीत गजाली मारताना दिसत आहेत. दादांचं काय होणार? याची चर्चा त्यांच्या समर्थकांत ऐकायला मिळत आहे. निकालाची सकाळ होईपर्यंत गजाली सुरु राहणार आहेत आणि ऐकणाऱ्यांना वेळेचे भान राहणार नाही, अशी परिस्थिती दिसते. मुलखात एकच धमाल सुरु झाली आहे.

दादा मोठ्या मनाचे – दादांबद्दल त्यांच्या समर्थकांना म ोठा आदर आणि अभिमान. सध्या त्यांचे समर्थक गावागावात आणि बाजारात बसून गजाली मारताना दिसतात. त्या मन लावून ऐकण्या सारख्या असतात. ते दादांची महती गातात. दादा किती दिलदार माणूस मोठ्या मनाचे आहेत, असं त्यांचे समर्थक सांगतात.

दिल्लीत मोठी वट – समर्थक पुढे सांगतात, दादांचा दोनवेळा पराभूत होऊनही दादांना दिल्लीत कॅबिनेट मंत्रिपद दिले गेले. अमितभाईंचा दादांवर वरदहस्त. म्हणे दादांचा शब्द अमितभाई झेलतात. दादांच्या शब्दाला दिल्लीत मोठा मान. दादांका राज्यसभेची खासदारकी मिळाली. कॅबिनेट मंत्रिपद मिळालं. मागील राज्य सरकारने दादांची सुरक्षा काढून घेतल्यावर दादांना केंद्राने सुरक्षा व्यवस्था पुरविली. दादांच्या मेडिकल कॉलेजचे उदघाटन करायला अमितभाई आले होते. दादा बोले अमितभाई चाले, असे दोघाचे संबंध आहेत. दादांना दिल्लीत मानाचे पान वाढलेले असते. पुन्हा मोठ मंत्रिपद मिळेल, असं त्यांचे समर्थक सांगतात. अमितभाईनी वेळात वेळ काढून दादांसाठी प्रचाराला आले होते, अशी माहिती दादांचे समर्थक देत असतात.

जणू रसाळ फणस – मालवणी मुलखात गजालींना पेव फुटले आहे. निकाला दिवशी काय होणार याची खात्री दादा समर्थक देत आहेत. दादा हे एकशे एक टक्के निवडून येतील याची खात्री आहे. सगळीकडे निकाल काय लागणार याची चर्चा आहे. दादांचा स्वभाव कसा आहे हे सांगताना, दादा हे वर-वर काटेरी फणसारखे, आतून रसाळ गऱ्यासारखे, लालधमक मधासारखे असं त्यांना जवळून ओळखणारे कौतुक करतात.

सगळा दांदांनी केला – विरोधी पक्षांनी काय केलं? असा सवाल करीत दादाचे समर्थक विरोधी नेत्यांवर शेलक्या मालवणी शब्दांमध्ये खवचट मल्लिनाथी करतात. त्यावेळी एकच हंशा पिकते. सगळा दादांनी केला. विकास दादांनी केला. विमान दादांनी आणला. तुतारी ट्रेन दादांनी आणली. रस्ते चकाचक केले, पूल बांधले. बेस्टचे चेअरमन असल्यापासून दादा सिंधुदुर्गात काम करतात. त्यावेळी स्व-खर्चाने साकव बांधले होते. हे सर्व दादांनी केलं. दादांनी मॉप केलं हो! असं त्यांचे समर्थक सांगत आहेत.

दादा इलेच समजा ? – राणेंवर प्रेम करणारे त्यांचे अनेक कार्यकर्ते आहेत. दादांनी यावेळी बरेच कष्ट घेऊन निवडणूक लढविली आहे. या वयातही रणरणत्या उन्हात फिरून प्रचार केला. ते चित्र त्यांच्या समर्थकांना आजही डोळ्यासमोर उभे राहते. दादांना मोठी सहानभूती आहे. सगळ्यांनी दादांना मतदान केले आहे. ते नक्की निवडून येतील याची खात्री समर्थक देत आहेत.

एक लाखा पेक्षा मताधिक्य मिळेल? – दादा एक लाख मतांधिक्यानी निवडून येतील याची खात्री त्यांच्या समर्थकांना आहे. ते कसे? असं विचारल्यावर त्यांच्या तोंडावर आणि बोटावर लेखा-जोखा / हिशोब आहे. कणकवली विधानसभा मतदारसंघात ४५ हजार, सावंतवाडी २५ हजार आणि मालवण विधानसभा मतदारसंघात ५ हजार असं एकूण दादांका सिंधुदुर्गातून कमीत कमी ६५ हजार मताधिक्य मिळेल असा दावा करतात. तर रत्नागिरीत आमच्या घटक पक्षाचे दोन आमदार आहेत. ते दादांना ५० हजारच मताधिक्य देतील, अशी खात्री आहे. एकूण एक लाखापेक्षा जास्त मताधिक्य दादांना मिळेल असा दावा समर्थक करतात. आम्ही सुरुवातीपासून लीड घेऊन पुढे जाऊ याची खात्री समर्थकांना आहे. दादा इलेच समजा? असा दावा समर्थक करीत आहेत. त्यांच्या समर्थकांत मोठा उत्साह व आत्मविश्वास दिसत आहे.

RELATED ARTICLES

Most Popular