26.7 C
Ratnagiri
Monday, October 14, 2024

iPhone 13 128GB च्या डिस्काउंट ऑफरने सर्वांना आनंद दिला…

ई-कॉमर्स वेबसाइट Amazon सणासुदीच्या काळात ग्राहकांना इलेक्ट्रॉनिक...

महिला ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धेत आज भारताला ऑस्ट्रेलियाचे आव्हान

भारतीय संघासमोर महिला ट्वेन्टी- २० विश्वचषक स्पर्धेत...

‘भूलभुलैया ३’ मध्ये माधुरी दीक्षित-विद्या बालन आमनेसामने

विनोदी भयपटांच्या प्रवाहात यशस्वी ठरलेल्या 'भूलभुलैया' चित्रपट...
HomeMaharashtraआनंदवार्ता ! मान्सून केरळात दाखल झाला

आनंदवार्ता ! मान्सून केरळात दाखल झाला

बळीराजासह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

देशातील अनेक शहरांचे तापमान ४२-५० डिग्री पार झाले आहे. वाढता उकाडा व तापमानामुळे हैराण असलेल्या नागरिकांसाठी आनंदाची बातमी आहे. नैऋत्य मोसमी वारे म्हणजेच मान्सून केरळच्या किनारपट्टीत दाखल झाला आहे. मान्सूनच्या या आगमनामुळे बळीराजासह नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. तर महाराष्ट्रात मान्सूनचे आगमन १० किंवा ११ जून रोजी होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. प्राथमिक अंदाजानुसार मान्सून केरळमध्ये ३१ मे रोजी धडकण्याची शक्यता होती. पण, तो वेगाने पुढे येत राहिल्याने आजच तो केरळमध्ये दाखल झाला आहे.

दरम्यान मान्सूनच्या आगमनानंतर देशात म्हणजेच ३१ मे पासून उष्णतेची लाट ओसरणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तवला आहे. तर येत्या काही दिवसांत अरबी समुद्रातून वारे वाहू लागल्याने तापमानातही काही अंशांची घट अपेक्षित असल्याचे हवामान विभागाचे वरिष्ठ शास्त्रज्ञ नरेश कुमार यांनी स्पष्ट केले आहे. महाराष्ट्राआधी मान्सून कर्नाटकात प्रवेश करणार असून त्यासाठी ६ किंवा ७ जूनची तारीख वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागांच्या पुर्वानुमानानुसार राज्यात १० ते ११ जूनदरम्यान पावसाची हजेरी पाहायला मिळणार असून, मुंबईपासून मान्सूनची सुरुवात होणार आहे. त्यानंतर १३ ते १४ जूनपर्यंत मान्सून बंगळुरूपर्यंत मजल मारेल असे सांगण्यात येत आहे.

उत्तर भारतात गेल्या काही दिवसांपासून उष्णता इतकी वाढली आहे की घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. दिल्ली, उत्तरप्रदेश, राजस्थान आणि बिहारसह अनेक राज्यांमध्ये पारा वाढला आहे. उष्णतेचा कहर सुरूच आहे. अनेक शहरांमध्ये तापमान ५० अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. तसेच पुढील काही आठवड्यांत मध्य आणि उत्तर भारतालाही उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. तर बुधवारी हवामान खात्याने अंदाज वर्तवला की, मान्सून केरळकडे सरकत आहे, जो आतापर्यंत मालदीवच्या आसपास होता तो आता केरळकडे सरकत आहे. त्यानंतर मग तो उत्तर पूर्व राज्यांकडे सरकणार आहे. तसेच उष्णतेच्या लाटेचा सामना करणाऱ्या उत्तर आणि मध्य भारतातील राज्यासाठीही हवामान खात्याने दिलासा दायक बातमी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular