उन्हाळ्यामध्ये अनेकांची जेवणावरची वासना कमी होते. एकतर उष्म्यामुळे रोजचे जेवण कमीच ग्रहण केले जाते. त्याऐवजी पाणीदार फळे ज्यांनी भूक आणि तहान भागेल आणि शरीराची गरज पूर्ण होईल यांचा समावेश करण्यावर जास्त भर दिला जातो. किंवा एक तर जेवणामध्ये टाक, दही, कोशिंबीर, हिरव्या भाज्या, ग्रीन सॅलड यांचे प्रमाण वाढविले जाते.
ग्रीन सॅलड कोणत्याही पदार्थाची चव वाढवण्याचे काम करते. अनेक जण दुपारी आणि रात्रीच्या जेवणासोबत सॅलड खाणे पसंत करतात. सॅलड खाल्ल्याने वजन तर नियंत्रणात राहतेच, पण उन्हाळ्यामध्ये निर्माण होणाऱ्या पोटाच्या आणि पचनाच्या समस्याही दूर होतात. ग्रीन सॅलड खाल्ल्याने प्रकृती तर चांगली राहतेच, शिवाय तुमची त्वचा आणि केसही निरोगी राहण्यास मदत होते.
ग्रीन सॅलड हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. टोमॅटो, कांदा, ओवा, काकडी, झुकीनी, कोबी, ब्रोकोली, अशा अनेक प्रकारच्या गोष्टींचा समावेश प्रामुख्याने ग्रीन सॅलडमध्ये केला जातो. या सर्व पदार्थांमध्ये कॅलरी खूप कमी आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. कॅलरीज कमी असल्याने शरीराचे वजन वाढत नाही. आहारात या सॅलडचा समावेश करून लठ्ठपणावर सहजरित्या मात करता येते. तसेच, उन्हाळ्यामध्ये शरीरात भासणारी पाण्याची गरज देखील पूर्ण होऊन शरीर हायड्रेट ठेवण्यास मदत मिळते.
ग्रीन सॅलडमध्ये जीवनसत्त्वे आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते, ज्यामुळे शरीर निरोगी राहते आणि पचनक्रिया सुधारते. उन्हाळ्यात ग्रीन सॅलड खाल्ल्याने पचनक्रिया सुधारते आणि पोटाच्या समस्या कमी होतात. ग्रीन सॅलडमध्ये कॅलरीजचे प्रमाण खूपच कमी असते, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. वाढते वजनामुळे त्रस्त असाल, तर उन्हाळ्यात आहारात ग्रीन सॅलडचा अवश्य समावेश करा. ग्रीन सॅलडमध्ये आढळणारे पोषक तत्व कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवतात. शरीरातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवल्यास हृदय निरोगी राहू शकते.