हापूस आंब्याचा विषय सोमवारी विधीमंडळ अधिवेशनात गाजला. हिवाळी शेखर निकम, आ. प्रवीण दरेकर, आ. प्रसाद लाड हे सत्तारुढ पक्षाचे आमदार ठाम राहिले. या बैठकीच्या शेवटी कृषीमंत्री अधिवेशनादरम्यान आश्वासन समितीच्या बैठकीत कोकणच्या हापूसला भौगोलिक मानांकन मिळावे या मागणीसाठी आ ना. दत्ता भरणे यांनी सरकार कोकणातील जनतेच्या पाठीशी असून कोकणचाच हापुस असेल असा विश्वास व्यक्त केला. नागपूर येथे हिवाळी अधिवेशनादरम्यान घेण्यात आलेल्या आश्वासन समितीच्या बैठकीत कोकणच्या अभिमान असलेल्या हापूस आंब्याच्या भौगोलिक मानांकन प्रकरणावर निर्णायक घडामोडी घडल्या. कृषी मंत्री दत्तामामा भरणे, राज्यमंत्री आशिष जैस्वाल यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीला आमदार शेखर निकम, आमदार प्रसाद लाड, आमदार प्रवीण दरेकर, कृषी सचिव विकासचंद्र रस्तोगी, आयुक्त सुरज मांढरे, महाबीजचे व्यवस्थापकीय संचालक भुवनेश्वरी आदी अधिकारी उपस्थित होते.’
कोकण हापूसवरील ‘गुजरात वादावर’ निकम, दरेकर लाड यांनी बैठकीत जोरदार भूमिका मांडली. यावेळी बोलताना आमदार शेखर निकम यांनी हापूस मानांकनावर उद्भवलेल्या बलसाड (गुजरात) वादाकडे सरकारचे लक्ष वेधले. कोकणातील हापूस आंब्याला २००-३०० वर्षांचा इतिहास आहे. त्याचा सुगंध, चव, रंग जगात कुठेही मिळत नाही. शास्त्रीय व कायदेशीर कसोट्यांवर कोकण हापूसच मानांकनाचा खऱ्या अर्थाने हक्कदार आहे, असे ठाम मत त्यांनी मांडले. आ. शेखर निकम यांनी सांगितले की या प्रकरणामुळे संपूर्ण कोकणातील बागायतदार व शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष आहे. कोकण कृषी विद्यापीठाने मांडलेली भूमिका सरकारने ठामपणे मांडावी, अशी त्यांनी मागणी केली.
सरकार कोकण हापूसच्या पूर्ण पाठिशी – आमदार शेखर निकम यांच्या मुद्यांना प्रतिसाद देताना कृषी मंत्री दत्ता भरणे यांनी स्पष्ट आश्वासन दिले. कोकण हापूसच भौगोलिक मानांकनाचा खरा हक्कदार आहे. सरकार कोकण हापूसच्या पाठीशी ठाम उभे राहील. या भूमिकेमुळे कोकणातील शेतकरी व बागायतदारांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान या बैठकीत कोकणातील कृषी प्रश्न मांडण्यात आले. यामध्ये आंबा फळपीक विम्याच्या कालावधी वाढवून घेण्यासही आ. निकम यशस्वी ठरले. बैठकीत आंबा फळपीक विमा योजनेचा कालावधी वाढवण्याबाबतही आमदार निकम यांनी जोरदार पाठपुरावा केला. त्यानंतर सरकारने महत्त्वाचा निर्णय घेत पुढील वर्षापासून १५ सप्टेंबर ते ३० मे असा विस्तारित कालावधी लागू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. हापूसच्या जीआय मानांकनावर सरकारची ठाम भूमिका आणि आंबा फळपीक विमा कालावधी वाढवण्याचा निर्णय या दोन्ही घडामोडींमुळे कोकणातील आंबा बागायतदारांच्या हिताचे दोन मोठे निर्णय या बैठकीत नोंदवले गेले आहेत.

