30.8 C
Ratnagiri
Tuesday, October 14, 2025

दहावी, बारावी बोर्ड परीक्षेसाठी राजमार्ग

कोकण व कोल्हापूर विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश...

जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना नोटिसा…

आपापल्या जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्यकेंद्रांकडे दुर्लक्ष केल्याचा ठपका...

पूररेषेतील बांधकामांसाठी अटीत शिथिलता

शहरातील पूररेषेतील बांधकामांसाठी नगरविकास खात्याच्या नियमांमध्ये शिथिलता...
HomeChiplunपेढांबे-खडपोलीवरील अवजड वाहतूक सुरू...

पेढांबे-खडपोलीवरील अवजड वाहतूक सुरू…

१४ चाकी ३० टनी गाड्यांची वाहतूक सुरू करण्याचे ठरवण्यात आले.

पिंपळी येथील जुना पूल खचल्यानंतर खडपोली मार्गावरील सर्व प्रकारची वाहतूक बंद झाली. पर्याय असलेल्या पेढांबे ते खडपोली मार्गावरदेखील गेले काही दिवस अवजड वाहतूक बंद होती. याबाबत प्रांत कार्यालयात झालेल्या बैठकीनंतर बुधवारी रात्रीपासून २० टनी अवजड वाहतूक सुरू करण्यात आली. रात्री १२ ते पहाटे ५ या कालावधीत एमआयडीसीत जाणारी ही अवजड वाहतूक सुरू होती. दरम्यान, औद्योगिक वसाहतीकडे जाणारी वाहतूक समस्या निर्माण झाल्याने ३० टनी गाड्यांची वाहतूक करण्याची मागणी उद्योजकांनी केली होती. त्यानुसार शुक्रवारी सकाळी ११ वाजता प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे, उपविभागीय पोलिस अधिकारी बेले, महावितरणचे पाटणकर, एमआयडीसीचे उपअभियंता हळदणकर, बांधकाम विभागाचे वाजे, प्रधानमंत्री सडक योजनेचे दाभोळकर यांच्यासह सरपंच, सदस्य, उद्योजक प्रतिनिधी व ग्रामस्थांनी रस्त्याची पाहणी केली. या वेळी वाहतुकीसाठी येणाऱ्या अडचणी सांगण्यात आल्या. शुक्रवारपासून १४ चाकी ३० टनी गाड्यांची वाहतूक सुरू करण्याचे ठरवण्यात आले. अवजड वाहतूक सुरू राहणार असल्याने उद्योजकांना दिलासा मिळाला आहे.

ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन – पेढांबे ते खडपोली रस्ता हा ७.७५ मीटरचा आहे. त्यापैकी ५.७५ मीटर रस्त्याचे रुंदीकरण करण्यात येणार आहे. त्यासाठी साईडपट्टीसह आवश्यक तेथे मोऱ्याही टाकण्यात येणार आहे. अडीच कोटी खर्चाचा प्रस्ताव काही दिवसांपूर्वीच पाठवण्यात आला आहे. रस्ता रुंदीकरणाबाबत ग्रामस्थांच्या शंकांचे निरसन करण्यात आले. पाहणीदरम्यान विरोध करणारे ग्रामस्थ मात्र पुढे आले नाहीत.

RELATED ARTICLES

Most Popular