सातबारातील फेरफार वारस नोंदणी, वडिलोपार्जित जमिन, घर आदी कामे आता तलाठी कार्यालयात न जाता नागरिकांना अशा कामांच्या नोंदीकरिता ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली पासून १ ऑगस्टपासून ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. सातबारा उतारा, फेरफार नोंदी तसेच वारस नोंदी इत्यादी कामांकरिता नागरिकांना तलाठी कार्यालयामध्ये जाण्याशिवाय पर्याय नव्हता. याकरिता बराच कालावधी लागायचा किंवा तलाठी कार्यालयाचे हेलपाटे मारावे लागायचे. तरीदेखील कामे वेळेवर होत नव्हते; परंतु आता या डिजिटल कालावधीमध्ये आणि तंत्रज्ञानाच्या युगात बऱ्याच क्षेत्रांमध्ये महत्त्वाची कामे आता ऑनलाईन पद्धतीने केली जातात.
याच अनुषंगाने शासनाच्या महसूल आणि भूमी अभिलेख या दोन्ही विभागांनी देखील अनेक महत्त्वाची कामे जसे की वडिलोपार्जित जमीन, घर आणि वारस नोंद करायची असेल तर आता ऑनलाईन करता येणार आहे. डिजिटल सातबारा उतारा तसेच ई फेरफार अशा प्रकारच्या सुविधा ऑनलाईन उपलब्ध करून दिलेले आहेत. ई मोजणी व्हर्जन २ उपलब्ध करून देण्यात आली असून, यामध्ये आता ऑनलाईन पद्धतीने प्रकरण दाखल करता येणार आहेत व प्रॉपर्टी कार्ड सातबारामध्ये आपोआप जोडले जाणार आहे. ऑनलाइन पद्धतीने वारस नोंद करण्याकरिता महाभूमी अथवा त्याच्या संकेतस्थळावर जाऊन लॉगिन करावे लागणार असून त्यानंतर ऑनलाईन अर्ज करता येणार आहे.