29.7 C
Ratnagiri
Sunday, June 16, 2024

इंदवटीतील दोन कुटुंबांचा स्थलांतरास नकार, १८० कुटुंबांना नोटिसा

तालुक्यातील दरडग्रस्त आणि भूस्खलन प्रवणक्षेत्रातील गावातील ग्रामस्थांना...

शाळांच्या परिसरात सीसीटीव्ही बसवा, पोलिस अधीक्षक कुलकर्णी

सर्व शाळांच्या परिसरामध्ये सीसीटीव्ही यंत्रणा बसवावी, तसेच...

चिपळुणात ठाकरेंच्या पाठीशी नवी ताकद

रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार...
HomeRajapurकोकणात पाच वर्षांत २३ हजार पासपोर्ट

कोकणात पाच वर्षांत २३ हजार पासपोर्ट

मुंबई येथे पासपोर्ट काढण्यासाठी होणारा खर्च आणि वेळेची बचत होते.

रत्नागिरी- सिंधुदुर्ग जिल्ह्याचे मध्यवर्ती केंद्र असलेल्या राजापूर पोस्ट कार्यालयातील पासपोर्ट काढण्याची सुविधा उपलब्ध आहे. परदेशवारीसाठी इच्छुकांकडून येथे उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. गेल्या पाच वर्षांमध्ये २३ हजारांहून अधिक लोकांनी पासपोर्ट काढला आहे. या कार्यालयामुळे रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोकांचे परदेशवारीच्या स्वप्नाची सफर सुखद झाली आहे. नोकरी, पर्यटन यासह अन्य विविध कामांसाठी कोकणातून परदेशात दरवर्षी अनेकजण ये-जा करत असतात. परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट हवाच असतो; मात्र, पूर्वी मुंबई येथे पासपोर्टचे कार्यालय होते.

कोकणातील लोकांना पासपोर्ट काढण्यासाठी सुमारे ५०० किलोमीटर अंतर कापून मुंबई गाठावी लागत होती. त्यामध्ये खर्चासह वेळेचाही अपव्यय होत होता. त्यामुळे कोकणात विशेषतः रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पासपोर्ट कार्यालय व्हावे, अशी मागणी लोकांकडून केली जात होती. त्याची दखल घेऊन कोकणवासीयांची परदेशवारी सुरळीत होण्यासाठी आणि पासपोर्ट काढण्याची सुविधा कोकणातील लोकांना स्थानिक पातळीवर मिळावी म्हणून हे कार्यालय खासदार विनायक राऊत यांच्या प्रयत्नांनी झाले. तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी हे कार्यालय मंजूर केले होते. हे कार्यालय मुंबई-गोवा महामार्गावर आणि शहरातील पोस्ट कार्यालयामध्ये असल्यामुळे प्रवास करणे दोन्ही जिल्ह्यांमधील लोकांसाठी फायदेशीर ठरत आहे.

मुंबई येथे पासपोर्ट काढण्यासाठी होणारा खर्च आणि वेळेची बचत होते. कोरोनानंतर पासपोर्ट काढणाऱ्यांचा वेग कमी झाला होता. पण गेल्यावर्षीपासून पुन्हा अर्ज करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. दरम्यान, पासपोर्ट काढण्यासाठी आलेल्यांमध्ये सर्वाधिक कोकणवासीय आखाती देशांमध्ये गेल्याचे दिसते. कोकणातून दूबईला नोकरीसाठी जाणाऱ्या तरुणांचे प्रमाण अधिक आहे. त्यामूळे हे कार्यालय त्यांना उपयुक्त ठरते तसेच सिंगापूरला पर्यटनासाठी जाणारेही अधिक आहेत. शिक्षणासाठी बहुसंख्य तरुणांचा कल हा इंग्लंडकडे असल्याचे दिसून आले आहे. भविष्यात परदेशात जाण्यासाठी इच्छुकांची संख्या अधिक आहे. मागील दोन वर्षांत परदेशात जाण्याची संधी नसली तरीही गर्भश्रीमंतांसह काही मध्यमवर्गीयही पासपोर्ट काढण्यासाठी अर्ज दाखल करत आहेत. त्यामुळे कोकणातून पासपोर्ट काढणाऱ्यांची संख्या भविष्यात दुप्पट होईल.

RELATED ARTICLES

Most Popular