26.3 C
Ratnagiri
Wednesday, September 3, 2025

कोत्रेवाडीतील कचरा प्रकल्पाला विरोध कायम, उपोषणकर्त्यांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष

कोत्रेवाडी येथील प्रस्तावित डंपिंग ग्राऊंड हटावसाठी ग्रामस्थांनी...

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...
HomeRatnagiri१५ डिसेंबर पासूनच्या हेल्मेट सक्तीच्या आदेशास तूर्तास स्थगिती

१५ डिसेंबर पासूनच्या हेल्मेट सक्तीच्या आदेशास तूर्तास स्थगिती

जनभावनेचा विचार करून हेल्मेट सक्तीचा स्थगिती देण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात १५ डिसेंबर पासून दुचाकीस्वारांना हेल्मेट सक्ती करण्याचे आदेश जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग यांनी काढले आहेत. नियम मोडल्यास १००० रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सिंह यांनी काढलेल्या प्रेस नोट मध्ये म्हंटले आहे की, सध्या दुचाकी धारकांचे मृत्युमुखी पडणाऱ्याचे प्रमाण वाढत आहे. हे लक्षात घेता सर्व नागरिकांच्या स्वतःच्या व इतरांच्या सुरक्षितपणे प्रवासासाठी, जनजागृती व वाहतूक नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचा निर्णय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीमार्फत घेण्यात आला आहे.

या निर्णयाच्या अनुषांगाने रत्नागिरी जुळ्यातील सर्व शासकीय / निम शासकीय आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या अधिकारी आणि कर्मचार्यांना तसेच कामानिमित्त शहरी भागात येणाऱ्या वाहनधारकांना सर्वांसाठी हेलमेट सक्ती आवश्यक असल्याचे म्हणण्यात आले आहे. त्यामुळे, १५ डिसेंबर पासून दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट सक्ती करणे बाबत निर्णय मोटार वाहन कायदा १९८८ चे कलम १२९ अन्वये  घेण्यात आला आहे.

नुकताच जिल्हाधिकाऱ्यांकडून १५ डिसेंबर पासून हेल्मेट सक्तीचा आदेश देण्यात आला होता. मात्र या आदेशाला पालकमंत्री उदय सामंत यांनी स्थगिती दिली आहे. जनभावनेचा विचार करून हेल्मेट सक्तीचा स्थगिती देण्यात आल्याचे मंत्री उदय सामंत यांनी सांगितले आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी ६ डिसेंबर रोजी हेल्मेट सक्तीचे आदेश काढल्यानंतर शहरी भागातील नागरीकामधून प्रतिक्रिया उमटू लागल्या. काहींनी या हेल्मेट सक्तीबद्दल मंत्री उदय सामंत यांच्याकडे तीव्र भावना व्यक केल्या. मंत्री उदय सामंत यांनी या जनभावनेचा आदर करून हेल्मेट सक्तीच्या आदेशाला स्थगिती दिली. त्यामुळे सध्यातरी शहरी भागातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास टाकला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular