31 C
Ratnagiri
Friday, May 9, 2025

निधी अभावी काजू तारण योजना पडली बंद – कृषी उत्पन्न बाजार समिती

बदलत्या हवामानाच्या परिणामामुळे दरवर्षी काजूची उत्पादकता घटलेली...

पाईपलाईनचे काम अखेर सुरू, शीळ धरण ते जॅकवेल परिसर

शीळ धरण कालवा ते जॅकवेलपर्यंतची " सुमारे...

जिल्हाभरात दुसऱ्या दिवशीही पावसाची हजेरी, नागरिकांची तारांबळ

सलग दुसऱ्या दिवशी सकाळीच पडलेल्या पावसाने जिल्हावासीयांना...
HomeRatnagiriपाच सेकंदात मदतीचा संदेश देणार ट्रान्सपॉडर्स उपकरण - मच्छीमारांसाठी योजना

पाच सेकंदात मदतीचा संदेश देणार ट्रान्सपॉडर्स उपकरण – मच्छीमारांसाठी योजना

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून जिल्ह्याला ३०० ट्रान्सपॉडर्स मशिन दिले आहेत.

मच्छीमारांच्या सुरक्षिततेसाठी केंद्र सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. मासेमारी दरम्यान बोट बंद पडली, आग लागली, बुडायला लागली अशी आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यास ५ सेकंदात मदतीचा संदेश संबंधित यंत्रणांना मिळणार आहे. त्यासाठी केंद्र शासनाच्या प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेतून जिल्ह्याला ३०० ट्रान्सपॉडर्स मशिन दिले आहेत. नौकांवर ही यंत्रणा मोफत बसवण्यात येणार आहे. काल एका दिवसात ६ नौकांना ही यंत्रणा बसवण्यात आली. जिल्ह्यांतील सागरी मासेमारी करणाऱ्या मच्छीमार नौकांसाठी पहिल्या टप्प्यात ३०० ट्रान्सपॉडर्स उपलब्ध झाले आहेत.

मच्छीमारांना ट्रान्सपॉडर हे उपकरण मोफत उपलब्ध होणार आहे. जिल्ह्यासाठी सुमारे २ हजार ट्रान्सपॉडर्स अपेक्षित आहेत. त्यापैकी पहिल्या टप्यात ३०० ट्रान्सपॉडर्स मत्स्य विभागास प्राप्त झाले आहेत. १०० साखरीनाटे तर २०० रत्नागिरीला मिळाले आहेत. कालपासून मत्स्य विभागाने ट्रान्सपॉडर्स बसवायला सुरवात केली आहे. ६ नौकांवर हे यंत्र बसवण्यात आले आहे. जास्तीत जास्त मच्छीमारांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन मत्स्य विभागाने केले आहे. यासाठी मच्छीमारांना ट्रान्सपॉडर्सबाबतचे प्रशिक्षण दिले आहे. या उपकरणाचे कार्यक्षेत्र (रेंज) २ हजार सागरी मैलापर्यंत राहणार आहे. त्यासाठी मोबाईल नेटवर्कची गरज भासणार नाही.

नौकेत केवळ १२ व्होल्ट डीसीचा सप्लाय लागेल. इस्रोच्या नभमित्र सिस्टिमवर वायफाय कनेक्ट होईल. या उपकरणाची जोडणी शासनामार्फत मोफत होणार असून उपकरणास दोन वर्षांची वॉरंटी आहे. ज्या नौकांना ‘केबिन’ असते अशा नौकामालकांनी तत्काळ हे उपकरण बसवून घ्यावे, असे आवाहन मच्छीमारांना करण्यात आले. एखादी आपत्कालीन परिस्थितीत या उपकरणाला असणारे तीन बटणापैकी एक दाबल्यास मच्छीमारांना तत्काळ मदत मिळू शकते.

पण सक्षम यंत्रणा विभागाकडे आहे का ? – उपकरण बसवल्यानंतर २४ तास लक्ष देणारी सक्षम यंत्रणा मत्स्य विभागाकडे उपलब्ध आहे का ?, असा सवाल मच्छीमारांनी उपस्थित केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular