25.8 C
Ratnagiri
Saturday, August 30, 2025

शिंदेंच्या मंत्र्यांवर लक्ष ठेवण्यासाठी अधिकारी…

राज्यात महायुती असली तरीही भाजपकडून कुरघोडींचे राजकारण...

पेढांबेतील पूल दुरुस्तीच्या प्रतीक्षेत, अवजड वाहतूक बंद

दुरुस्तीअभावी धोकादायक झालेला पेढांबे येथील जुन्या पुलावरून...

जनआरोग्य योजनेतील कार्ड बनवा : एम. देवेंदर सिंह

एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजना, महात्मा...
HomeRatnagiriरत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक मतदान चिपळूणमध्ये, एकूण किती टक्के मतदान.. जाणून घ्या

रत्नागिरी जिल्ह्यात सर्वाधिक मतदान चिपळूणमध्ये, एकूण किती टक्के मतदान.. जाणून घ्या

मतदारसंघात शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना असे उमेदवार रिंगणात आहेत,

नागरिकांच्या उत्साहामुळे रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला उत्स्फूर्त सुरुवात झाली आहे, सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यात २२.९३ टक्के…. नागरिकांच्या उत्साहामुळे रत्नागिरी जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदानाला उत्स्फूर्त सुरुवात झाली आहे. सकाळी ११ वाजेपर्यंत जिल्ह्यात २२.९३ टक्के मतदान झाले आहे. पहिल्या टप्प्यात मतदान करुन प्रमुख राजकीय पक्षाच्या उमेदवारांनी मतदारसंघाचा दौराही सुरू केला आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत ५०.०४ टक्के मतदान झाले होते. चिपळूण मतदारसंघात सर्वाधिक ५२.३३ टक्के मतदान झाले. रत्नागिरी जिल्ह्यातील पाच विधानसभा मतदारसंघात ३८ उमेदवार निवडणूक लढवत आहेत. त्यात तब्बल २२ उमेदवार अपक्ष आहेत. जिल्ह्यातील रत्नागिगरी, चिपळूण, गुहागर आणि दापोली या चार मतदारसंघात दोन प्रमुख उमेदवारांमध्ये थेट लढत होईल, असे चित्र आहे. केवळ राजापूर मतदारसंघात काँग्रेसकडून बंडखोरी झाली असल्याने तेथील लढत तिरंगी होत आहे.

राजापूर, रत्नागिरी, गुहागर आणि दापोली या चार मतदारसंघात शिंदेसेना विरुद्ध उद्धवसेना असे उमेदवार रिंगणात आहेत, तर चिपळूण मतदारसंघात दोन राष्ट्रवादी आमनेसामने आहेत. सकाळी ७ ते ११ या वेळेत दापोली मतदारसंघामध्ये १८.३२, गुहागरमध्ये १७.०५, चिपळूणमध्ये २४.५७, रत्नागिरीत १८.८० तर राजापुरात २४.०७ टक्के मतदान झाले आहे. मंत्री उदय सामंत, राजापूरचे उमेदवार किरण सामंत यांनी पाली येथे पहिल्या टप्प्यातच मतदान करुन मतदारसंघाचा दौरा सुरू करुन आढावा घेण्यास सुरुवात केली आह. मंत्री उदय सामंत यांनी प्रथम रत्नागिरी शहरातील अनेक बूथना भेट दिली आणि त्यानंतर ग्रामीण भागाकडे आपला मोर्चा वळवला.

दुपारी ३ वाजेपर्यंतची आकडेवारी – दापोली – ५०.८%, गुहागर – ४९.०१%, चिपळूण- ५२.३३%, रत्नागिरी – ४६.२%, राजापूर- ५२.१९%

RELATED ARTICLES

Most Popular