27.6 C
Ratnagiri
Sunday, August 31, 2025

आरवली-संगमेश्वर ते बावनदी येथील खड्डे जैसे थे

राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी आरवली-संगमेश्वर ते बावनदी...

मुंबई-गोवा महामार्गासाठी ना. योगेश कदम यांचे गणपतीबाप्पाला साकडे

पुढच्या वर्षी महामार्ग पूर्ण होईल असे दरवर्षी...

सिलेंडरच्या स्फोटात संगमेश्वरातील कुटुंबावर मोठा घाला

कोल्हापूर येथे ही दुर्घटना घडली आहे. गणेशोत्सवासाठी...
HomeChiplunचिपळूणच्या गोविंदगडावर सापडले ऐतिहासिक तोफगोळे

चिपळूणच्या गोविंदगडावर सापडले ऐतिहासिक तोफगोळे

८० तोफगोळे सापडले असून ते पुरातन काळातील दगडी तोफगोळे असल्याचे समोर आले आहे.

शहरातील गोवळकोट येथे इतिहासाची साक्ष देणाऱ्या गोविंदगडावर तोफगोळ्यांचा ऐतिहासिक ठेवा सापडला आहे. गडावर फिरण्यासाठी गेलेल्या तरुणांना हे तोफगोळे निदर्शनास आले. अधिक खोदाई केल्यानंतर तब्बल ८० तोफगोळे सापडले असून ते पुरातन काळातील दगडी तोफगोळे असल्याचे समोर आले आहे. यापूर्वी देखील तोफा तसेच तोफगोळे येथे सापडले होते. त्याचे जतन व संवर्धन करण्यात आले आहे. चिपळूणच्या गोवळकोट परिसरात गोविंदगड हा ऐतिहासिक किल्ला आहे. या गडावर गेल्यानंतर इतिहासाची साक्ष देणाऱ्या अनेक गोष्टी आढळून येतात.

येथील राजे प्रतिष्ठान तसेच स्थानिक तरुण गडावर जाऊन स्वच्छता देखील करत असतात. अनेक पर्यटक देखील येथे येत असतात. काही वर्षांपूर्वी येथे ऐतिहासिक तोफा देखील सापडले होते. त्या तोफा साफसफाई करून जतन देखील करण्यात आले आहेत. पुरातन काळातील या तोफा आजही मजबूत खणखणीत असून इतिहासाची साक्ष देताना दिसत आहेत.

तोफगोळे आढळले – सोमवारी सायंकाळी शुभम हरवंडे, सनी गिजे, युवराज बेचावडे, ऋग्वेद हरवंडे, दिगंबर बांदरे आदी तरुण गडावर गेले होते. येथे फेरफटका मारत असताना त्यांना सुरुवातीला २ दोन तोफगोळे आढळून आले. त्यांनी येथील माती उकरून बाजूला केली असता आणखी काही गोळे असल्याचे दिसून आले. त्यांनी लगेच राजे सामाजिक प्रतिष्ठानचे अध्यक्ष विशाल राऊत यांना संपर्क केला असता ते देखील तात्काळ त्याठिकाणी धावून आले. त्यांनी उपस्थित तरुणांना योग्य ते मार्गदर्शन करून खोदाई सुरू केली.

८० तोफगोळे – एक-एक करता तब्बल ८० तोफगोळे बाहेर काढण्यात यश आले. हे सर्व दगडी तोफगोळे असून त्याचे जतन करण्याचा निर्णय राजे सामाजिक प्रतिष्ठानने केला आहे. यापूर्वी देखील येथे ४ ते ५ तोफगोळे मिळाले होते.. परंतु इतक्या मोठ्या संख्येने तोफगोळे सापडण्याची ही पहिलीच वेळ आहे. मिळालेला हा ऐतिहासिक ठेवा म्हणजे गडदेवता आई रेडजाई व ग्रामदेवता आदिशक्ती करंजेश्वरीचा आशीर्वाद आहे. अशी प्रतिक्रिया उपस्थित तरुणांनी दिली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular