26.4 C
Ratnagiri
Tuesday, June 24, 2025

रत्नागिरी नगरपरिषदेत सत्ता मिळविण्यासाठी राजकीय डावपेच…

रत्नागिरी नगर परिषद निवडणूकीचे मतलई वारे आता...

विद्यार्थ्याच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टरच्या चौकशीचे आदेश…

खेड तालुक्यातील तळे कासारवाडी येथे नुकत्याच दहावी...

चिपळूण-कऱ्हाड मार्ग अवजड वाहनांसाठी बंदच…

कोयना ते पाटणदरम्यानच्या पुलाचे बांधकाम सुरू असताना...
HomeRatnagiri'थ्रीडी शो'च्या माध्यमातून इतिहास जिवंत - उपमुख्यमंत्री अजित पवार

‘थ्रीडी शो’च्या माध्यमातून इतिहास जिवंत – उपमुख्यमंत्री अजित पवार

थिबापॅलेस येथे सुमारे २५ कोटी रुपये खर्च करून थ्रीडी शो.

‘थिबा पॅलेस येथील थ्रीडी मल्टिमीडिया शो या प्रकाश योजनेच्या माध्यमातून ऐतिहासिक वास्तूला नवा आयाम देऊन दूरदृष्टी ठेवल्याबद्दल मंत्री उदय सामंत यांचे कौतुक आहे. अत्याधुनिक प्रकाश योजनेमुळे केवळ स्थानिकच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आणि आपल्या देशभरातील पर्यटक याकडे आकर्षित होतील. प्रकाश आणि छायाचित्रणाच्या माध्यमातून इतिहास जिवंत करण्याचा हा एक सुंदर आणि अनोखा अशाप्रकारचा प्रसंग आहे. आपण जेव्हा रत्नागिरीबद्दल बोलतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज यांचा या पवित्र भूमीशी असणारा जिव्हाळा आपण विसरून चालणार नाही,’ असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. थिबापॅलेस येथे सुमारे २५ कोटी रुपये खर्च करून उभारण्यात आलेल्या थ्रीडी मल्टिमीडिया शोच्या लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. या वेळी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम आदी उपस्थित होते.

अजित पवार म्हणाले, ‘युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांची आज तिथीप्रमाणे जयंती आहे. माझ्या महाराष्ट्रातल्या जनतेला त्या जयंतीच्या निमित्ताने मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो, मानाचा मुजरा करतो. आजचा दिवस रत्नागिरी शहराकरिता अतिशय महत्त्वाचा आणि ऐतिहासिक अशाप्रकारचा आहे. कारण महाराष्ट्राच्या पर्यटनाला समृद्धीला पुढे नेणाऱ्या आणखी एका पर्वाची सुरुवात आपण आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने केलेली. पॅलेस परिसरात थ्रीडी प्रकाश योजनेच्या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहण्याचा आणि सुंदर क्षणाचा साक्षीदार होण्याचा आनंद आणि अभिमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला आहे. आपल्या सर्वांच्या साक्षीनं या प्रकाशयोजनेच्या खुल्या नाट्यगृहाचं लोकार्पण झाले, असंही मी जाहीर करतो. सर्व माझ्या नागरिकांना सांगायचे की, आज सभागृहात महत्त्वाची कामं होती; पण मी दुपारपर्यंत सगळी उरकली आणि या कार्यक्रमांना आलो.

मी रत्नदुर्ग किल्ल्यावरच्या शिवसृष्टीचं लोकार्पण केले. पर्यटन वाढवणारं, अशा पद्धतीचे काम आज २५ कोटी रुपये खर्च करून इथे झाले आहे. थिबापॅलेस समृद्ध भारताचा एक अनमोल आणि इतिहासातील एक जिवंत दस्तऐवज आहे. या सुंदर प्रकाश योजनेमुळे रत्नागिरीचे नाव आता आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकू दे आणि आपल्या कोकणच्या पर्यटन व्यवसायाला मोठी चालना मिळू दे अशाप्रकारच्या शुभेच्छा देतो, असे पवार म्हणाले.

उदय सामंत यांचे पवारांकडून कौतुक – थिबा पॅलेस परिसरातला सुंदर प्रकाशयोजनेच्या महत्त्वाच्या कार्यक्रमाला मला बोलावल्याबद्दल आयोजकांना मी मनापासून धन्यवाद देतो. या सुसंस्कृत रत्नागिरीचे नाव आता देशभरात जाणार आहे. रत्नागिरीकरांनी एका चांगल्या माणसाची निवड केल्याबद्दल त्यांनाही मी धन्यवाद देतो आणि थांबतो.

RELATED ARTICLES

Most Popular