26.1 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeRajapurमूरमधील घर शॉर्टसर्किटच्या आगीत खाक , लाखोंचे नुकसान

मूरमधील घर शॉर्टसर्किटच्या आगीत खाक , लाखोंचे नुकसान

तालुक्यातील मूर येथील संजय नांदलस्कर यांच्या घराला शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या आगीत संपूर्ण घर जळून खाक झाले आहे. या आगीमध्ये सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी सुमारे ११ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या प्रकरणी मिळालेल्या माहितीनुसार, मूर शेट्येवाडीनजीक राहणारे नांदलस्कर हे आज सकाळी काही कामानिमित्त बाहेर गेलेले असताना सकाळी १० वा. च्या सुमारास त्यांच्या घरातून धूर येत असल्याचे शेजारी राहणाऱ्या ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. त्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी नांदलस्कर यांच्या घराकडे धाव घेतली. तोपर्यंत संपूर्ण घराला आगीने वेढले होते.

ग्रामस्थांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला; मात्र, पाण्याची टंचाई असल्याने आग विझवण्यात त्यांना यश आले नाही. या दरम्यान, आगीच्या उडालेल्या भडक्यामध्ये काही वेळातच संपूर्ण घर जळून खाक झाले.  आग नेमकी कशामुळे लागली, याचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी शॉर्टसर्किटने घराला आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. दरम्यान, या आगीमध्ये त्यांच्या घरामध्ये असलेला टीव्ही, फ्रिजसह अन्य इलेक्ट्रिक वस्तू, कपड्यांचे कपाट यांसह अन्य वस्तू जळून खाक झाल्या आहेत.

दरम्यान, नांदलस्कर यांच्या घराला आग लागली त्या वेळी घरामध्ये चार सिलेंडर होते. आग लागलेली असताना ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत सर्वप्रथम सर्व सिलेंडर घराच्या बाहेर काढले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला; मात्र, सिलेंडरचा स्फोट झाला असता तर आजूबाजूच्या घरांनाही धोका पोहोचण्याची शक्यता होती. दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते आप्पा साळवी, मूर सरपंच वैष्णवी आगटे, माजी सरपंच भास्कर सुतार, पोलिस पाटील प्रकाश यद्रुक, सुर्वे, रवींद्र सुर्वे, अनिल इंदुलकर, सतीश सुर्वे यांच्यासह अन्य ग्रामस्थांनी घटनास्थळी जात मदतकार्य केले.

RELATED ARTICLES

Most Popular