रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना रूग्णांसाठी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड या कंपनीच्या वतीने या मोहिमेंतर्गत सरकारी रुग्णालयाला सहा व्हेंटिलेटरची मदत केली आहे. हे सहा व्हेटिंलेटर जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत सरकारी रुग्णालयाला सुपूर्द करण्यात आले आहेत, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीने केलेल्या मदतीमुळे नक्कीच राज्यातील वैद्यकीय अडचणी दूर होतील.
कोरोनाच्या या महाभयंकर लाटेचा सामना करण्यासाठी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीने राज्यामध्ये ४ कोटी किंमतीचे एकूण ३४ व्हेंटीलेटरची मदत केली आहे. तसेच मिशन होप मोहिमेच्या माध्यमाने संपूर्ण देशात कोरोना रूग्णांसाठी लागणारी मदत पुरविण्याचे कार्य ही संस्था करत आहे. याआधीही महाराष्ट्रातील सरकारी रूग्णालयांना तीन कोटी मुल्याचे २९ व्हेंटीलेटरर्स पुरविण्यात आले आहेत. कोरोना महामारीच्या या लढाईमध्ये आत्ता हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनी सुद्धा उतरली आहे.
हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक संजीव मेहता यांनी या बद्दलची माहिती देताना सांगितले कि, महाराष्ट्रातील कोरोनाचे वाढते संक्रमण आणि त्यामानाने जाणवणाऱ्या वैद्यकीय सुविधांचा तुटवडा लक्षात घेता, या संकट काळामध्ये सर्वांनी एकत्रितरीत्या सहभाग घेऊन, कोरोनाशी लढा देण्यासाठी आपल्याकडील स्त्रोतांचा एकत्रित वापर केला पाहिजे. मागील काही महिने अनेक ठिकाणी अनेक वैद्यकीय उपकरणांचा तुटवडा जाणवला. त्यावेळी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड कंपनीने पोर्टीया आणि केव्हीएन फाउंडेशनच्या भागीदारीमधून भारतासाठी ५ हजाराहून अधिक ऑक्सिजन कॉंन्सन्ट्रेटर्स विमानमार्गे मागवण्याची घोषणा केली होती. एक सकारात्मक गोष्ट घडली कि यामुळे रुग्णांना घरोघरी ऑक्सिजन पुरवठा करता आला. तसेच कंपनीने यापूर्वीही जिल्ह्यातील वक्रतुंड लाईफ़ केअर हॉस्पिटला २५ आयसीयु बेड आणि व्हेंटिलेटर तसेच चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलला ऑक्सिजन कॉन्सेनट्रेटर आणि व्हेटिंलेटरची मदत पुरवली आहे.