27 C
Ratnagiri
Monday, May 20, 2024

चिपळूणला सलग दुसऱ्या दिवशी वादळी वारा

शुक्रवारी सलग दुसऱ्या दिवशी सायंकाळी चिपळूण आणि...

कोकणातील तब्बल ६१३ गावे दरडीच्या सावटाखाली

कोकणातील शेकडो गावे आजही दरडींच्या सावटाखाली आहेत....

कोकणात वादळामुळे महावितरणला ५१ लाखांचा फटका

चिपळूण व गुहागर तालुक्यात झालेल्या वादळी वारा...
HomeRatnagiriअबब ! स्मशानभूमीत भूत !

अबब ! स्मशानभूमीत भूत !

रत्नागिरीतील दापोलीमध्ये सध्या एका वेगळ्याच विषयाची चर्चा रंगली आहे. कोकणामध्ये भूताखेतांची चर्चा होणे हे काही कोकणवासियासाठी नवीन नाही. कोकणातील अशा प्रकारांवर अनेक मालिका सुद्धा सुरु आहेत. पण खरच असतात का भूत !

दापोली मधील मौजे दापोली येथील स्मशानभूमीमध्ये भूत नाचत असल्याची अफवा कोणीतरी पसरवली. आणि हां हां म्हणता अस्ख्या जिल्ह्यामध्ये दापोलीतील स्मशानभूमीतील भुताची वार्ता वाऱ्यासारखी पसरली. मौजे दापोली ही स्मशानभूमी दापोली नगरपालिकेच्या अखत्यारीत येते. त्यामुळे तेथील सर्व कामकाज हे दापोली नगरपालिकेच्या देखरेखीखाली होते. कोरोनाच्या वाढत्या प्रभावामुळे मृत्यूचे प्रमाणदेखील वाढलेलं आहे. कोरोना मृत व्यक्तीवर शासनाने आखून दिलेल्या नियमावली प्रमाणेच अंत्यसंस्कार केले जातात. त्यामुळे मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी नगरपालिकेकडे असल्याने स्मशानभूमीमध्ये दहन स्टांडची संख्या वाढवण्यात आली आहे. परंतु, हे स्मशान उघड्यावरच असल्याने बाजूला असणार्या इमारतीमधील आणि वस्तीतल्या लोकांना त्या धुराचा प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

स्मशानभूमीच्या दहन स्थळावरील पत्र्यांवर रात्रीचे कोणतरी दगडफेक करत असल्याचे प्रकार शेजारी राहणाऱ्या काही तरुणांच्या निदर्शनास आले. तसेच सफेद वस्त्रामध्ये कोणीतरी नाचत असल्याचे सुद्धा काही जणांनी पहिले, त्यामुळे स्मशानभूमीमध्ये भूत आहे अशी सगळीकडे बातमी पसरली. ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अजय पवार हे या सर्व प्रकरणात लक्ष घातले असून, निव्वळ कोणतरी गावाची बदनामी करण्यासाठी असले प्रकार करत आहे, खरा प्रकार काहीतरी वेगळाच आहे. दापोली शहर आणि मौजे दापोलीमधील युवावर्ग या भूतांचा शोध घेण्यासाठी रात्रभर पाळत ठेवून होतेत, मध्यरात्री पोलिसांचीहीमदत त्यांनी घेतली, परंतु, नेमके त्या दिवशी तसा काहीच प्रकार घडला नाही. त्यामुळे ग्रामस्थांचा संशय नदीकिनारी संध्याकाळी फिरायला येणाऱ्या तरुणांवर आहे. तरी पोलिसांनी सगळा प्रकार उघडकीस आणून अशा लोकांचा बंदोबस्त करावा अशी मागणी पवार यांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular