25.9 C
Ratnagiri
Sunday, September 24, 2023
HomeRatnagiriजिल्ह्यात दहिहंडीचा अपार उत्साह लाखमोलाची दहीहंडी फुटणार

जिल्ह्यात दहिहंडीचा अपार उत्साह लाखमोलाची दहीहंडी फुटणार

माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूशेठ पाटील मित्रमंडळाच्यावतीने एक लाखाच्या दहीहंडीचे आयोजन .

ढाकूमाकूमऽऽ ढाकूमाकूमऽऽ… बोल बजरंग बली की जय… चा जयघोष गुरूवारी सर्वत्र घुमणार असून खंडाळ्यात पुन्हा एकदा लाखमोलाची दहीहंडी फुटणार आहे. बाबूशेठ पाटील मित्रमंडळाच्यावतीने दहीहंडी स्पर्धेचे आयोजन खंडाळा येथे करण्यात आले आहे. जिल्हात गोकुळाष्टमीसह दहीकाल्याची जय्यत तयारी सुरू असून दहीहंड्या फोडण्यासाठी जिल्ह्यातील अनेक गोविंदा पथके सज्ज झाली आहेत. रत्नागिरी शहरासह ग्रामीण भागात दहीहंडी स्पर्धांचे आयोजन केले आहे. तालुक्यातील वाटद-खंडाळा येथे माजी जिल्हा परिषद सदस्य बाबूशेठ पाटील मित्रमंडळाच्यावतीने एक लाखाच्या दहीहंडीचे आयोजन केले आहे. गोविंदा पथकावर लाखो रूपयांच्या बक्षिसांची उधळण करणाऱ्या बाबूशेठ पाटील मित्रमंडळाने यावर्षीदेखील भरघोस बक्षिसांची घोषणा केली आहे.

सलामीसाठी २५ हजारापर्यंत बक्षीस यावेळी ठेवण्यात आले आहे. याबाबतची माहिती देताना प्रसाद उर्फ बाबूशेठ पाटील यांनी सांगितले की, खंडाळा येथे ही दहीहंडी स्पर्धा होणार असून पाचव्या थराच्या सलामीसाठी ५ हजार रूपये, ६ व्या थरासाठी ७ हजार रुपये, सातव्या थरासाठी १० हजार व ८ व्या थरावर सलामी देणाऱ्या गोविंदा पथकाला २५ हजार रूपयांचे बक्षिस जाहीर केले असल्याचे पाटील यांनी सांगितले. स्पर्धेच्या अटी नियम व आयोजकांनी राखून ठेवले असून जिल्ह्यतील सर्व गोविंदा पथकांनी खंडाळा येथील दहहंडी स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आयोजकांनी केले आहे. दरम्यान, दहीहंडी स्पर्धे निमित्त खास आकर्षण म्हणून कोल्हापूर येथील ऑर्केस्ट्रा धडाका याचा लाईव्ह शो साऱ्यांना पाहता येणार असल्याचे आयोजकांनी यावेळी सांगितले.

RELATED ARTICLES

Most Popular