28.9 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeRatnagiriशैक्षणिक साहित्याच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ

शैक्षणिक साहित्याच्या दरात पंधरा टक्क्यांनी वाढ

शैक्षणिक साहित्यांसह पाठ्यपुस्तके, गणवेश खरेदी करण्यात येत आहेत.

शहरी व ग्रामीण भागातील शाळा सुरू होण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे पालकांनी शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी शहराचा रस्ता धरला आहे. येथील बाजारात खरेदीसाठी गर्दी होत आहे. वह्या, पुस्तके, स्कूल बॅग, वॉटरबॉटल, टिफिनबॉक्स, गणवेश चप्पल, छत्री, रेनकोट खरेदीसाठी पालकांची गर्दी वाढत आहे; मात्र यंदा शैक्षणिक साहित्यांच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. सरकारी व अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जातात शिवाय आठवीपर्यंत गणवेशही देण्यात येतो; परंतु विनाअनुदानित खासगी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी अन्य शैक्षणिक साहित्यांसह पाठ्यपुस्तके, गणवेश खरेदी करण्यात येत आहेत.

सीबीएसई माध्यमांच्या शाळा काही दिवसांपूर्वीच सुरू झाल्या आहेत, तर काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा १३ जूनपासून सुरू होत आहेत. अनुदानित व जिल्हा परिषदेच्या शाळा मात्र १५ जूनपासून सुरू होणार आहेत. शाळा सुरू होण्याची तारीख जवळ आल्याने आता शैक्षणिक साहित्याच्या खरेदीसाठी पालकांची तारांबळ उडाली आहे. बाजारात शैक्षणिक साहित्याने भरलेली दुकानात स्कूलबॅग उभ्या व आडव्या अशा दोन प्रकारात उपलब्ध आहे. बॅगांच्या किमती २०० ते अडीच हजार रुपयांपर्यत आहेत. यावर्षी स्कूलबॅगच्या किमती स्थिर आहेत; मात्र कार्टून, फोल्ड बॅगा विद्यार्थ्यांच्या पसंतीस उतरत आहेत. नियमित दप्तराच्या दर्शनी भागात एकच कार्टून चित्र असते.

फोल्ड बॅगमध्ये एकाचवेळी ती वेगवेगळी चित्रे आहेत. डिस्नी, बार्बी डॉल, डोरेमॉन, स्पायडर मॅन अशी चित्र असलेली तीन फोल्ड आहेत. जेव्हा हवे तेव्हा यापैकी एक चित्र दर्शनी भागात ठेवता येते. या दप्तरांची किंमत ५०० ते १ हजार रुपये आहे. यावर्षी शालेय वह्यांची नामांकित कंपन्या व स्थानिक कंपन्यांनी दरात वाढ केलेली नाही. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत दर स्थिर आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular