23.2 C
Ratnagiri
Monday, December 23, 2024

मोदींनी जनतेचा खिसा कापला, पॉपकॉर्नपासून जुन्या कारपर्यंत जीएसटी वाढला

आधीच महागाईत होरपळणाऱ्या जनतेला दिलासा देण्याऐवजी मोदी...

रत्नागिरी जिल्हा रुग्णालयाला ८५ ‘एमबीबीएस’ डॉक्टर

जिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या रिक्त पदाचा आणि...

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी पुढाकार, गडकिल्ले संवर्धन

रत्नदुर्ग किल्ल्याच्या संरक्षणासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठानच्या...
HomeSportsभारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला अपघात

भारतीय क्रिकेटपटू ऋषभ पंतच्या कारला अपघात

पहाटे लवकर निघून आपण घरी जाऊ आणि आईला सुखद धक्का देऊ हे ठरवल्यावर पंतने कारनेच आपले घर गाठण्याचे ठरवले होते.

भारतीय क्रिकेट संघाचा यष्टीरक्षक ऋषभ पंतच्या मर्सिडीजने ताशी १५० किमी वेगाने येणाऱ्या कारला मागे टाकले. तेवढ्यात समोर एक खड्डा आला. त्यामुळे त्यांची कार ५ फुटांपर्यंत उडी मारून प्रथम बसला धडकली. त्यानंतर दुभाजकावरून पुढे जात असताना तिला आग लागली.

आपण घरी येणार आहोत, ही माहिती त्याने आपल्या आईलाही दिली नव्हती. कारण आईला त्याला सरप्राइज द्यायचे होते. पहाटे लवकर निघून आपण घरी जाऊ आणि आईला सुखद धक्का देऊ हे ठरवल्यावर पंतने कारनेच आपले घर गाठण्याचे ठरवले होते. त्यामुळे पहाटे लवकर उठून पंत हा आपल्या घराकडे कारने निघाला. यावेळी पंतने ड्रायव्हरही सोबत ठेवला नाही. पण पंतची रात्री झोप कदाचित पूर्ण झाली नव्हती आणि तो पहाटे लवकर निघाला होता. त्यामुळे गाडी चालवत असताना त्याला डुलकी लागली आणि त्याचा गाडीवरील ताबा सुटला.

अपघाताच्या वेळी घटनास्थळी उपस्थित असलेले डॉ. रवींद्र सिंग आणि गंगा डेअरीमध्ये काम करणाऱ्या आर्यनचे हे म्हणणे आहे. घटनास्थळाजवळ दुधाची डेअरी आहे. प्रथम घटनास्थळी पोहोचलेला आर्यन हा कर्मचारी आहे. यामुळे रुग्णवाहिका बोलविण्यात आणि पंत यांना रुग्णालयात नेण्यात मदत झाली.

गंगा डेअरीत काम करणाऱ्या आर्यनने सांगितले की, सकाळचे ५:१५ वाजले असतील. मी गेटवर होतो तेव्हाच मला मोठा स्फोट ऐकू आला. मी बाहेर आलो तेव्हा एक गाडी जळत असल्याचे दिसले. धावत धावत त्याच्यापर्यंत पोहोचलो, कारमधून उतरल्यावर ऋषभ पंत बाहेर पडलेला दिसला. तो खूप जखमी झाला होता. संपूर्ण शरीर जळाले होते, कपडे फाटले होते. तो शाल सारखे काही तरी पांघरून बाहेर बसला होता. आर्यनने सांगितले की, पंत कारपासून ५० मीटर अंतरावर पडले होते. जखमी क्रिकेटपटूला पाहून मी तात्काळ रुग्णवाहिका बोलावली. एक रुग्णवाहिका आली आणि त्याला रुग्णालयात पाठवले.

RELATED ARTICLES

Most Popular