24.4 C
Ratnagiri
Friday, December 8, 2023

गंजलेल्या खांबावर विद्युत वाहिन्या , मोडकाआगारमधील स्थिती

मोडकाआगर येथील नारळ, सुपारी व काजूच्या बागेतील...

पक्षाच्या कोकणातील नेत्यांना संपवण्याचा विडा – रामदास कदम

कोकणातील पक्षाच्या नेत्यांना संपवण्याचा विडा उद्धव ठाकरे...

श्रमदानातून बंधारे उभारल्याने एक कोटीची बचत – पाणी जिरवा मोहीम

पाण्याची बचत व साठवण केल्यास त्याचे उन्हाळ्यात...
HomeRatnagiriनववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

शनिवार दि. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी २०२३ ला समुद्रकिनारे, महामार्गावर पोलिसांची विशेष गस्त असणार आहे.

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जिल्ह्यातून, राज्यातूनच नव्हे तर संपूर्ण देशातून पर्यटक रत्नागिरीमध्ये दाखल होत आहेत. नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्ह्यातही आनंदाचे व जल्लोषाचे वातावरण तयार झाले आहे. शनिवार दि. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी २०२३ ला समुद्रकिनारे, महामार्गावर पोलिसांची विशेष गस्त असणार आहे.

प्रत्येक पोलिस ठाण्याच्या हद्दीत चालणाऱ्या जल्लोष कार्यक्रमांवर नजर ठेवण्यासाठी विशेष गस्ती पथकांची निर्मिती केली आहे. मद्यप्राशन करून हुल्लडबाजी करणाऱ्यांवर विशेष लक्ष ठेवण्यासाठी साध्या वेषातील पोलिस पथके कार्यरत आहेत. मद्यप्राशन करून वाहन चालवल्यास ब्रेथ एनालाईझर या यंत्राद्वारे चाचणी करून तत्काळ कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

जिल्ह्यातील वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी विविध ३४ ठिकाणी नाकाबंदी करण्यात येणार आहे. सोशल मिडियावरील नववर्षाच्या स्वागताचे अश्‍लील आणि आक्षेपार्ह पोस्टवर सायबर पोलिस ठाण्याद्यावेर करडी नजर ठेवण्यात येईल. याबाबत अधिक माहितीसाठी व मदतीसाठी ११२ या क्रमाकांवर संपर्क साधावा,असे आवाहन पोलिस विभागाकडून करण्यात आले आहे.

३१ डिसेंबर व १ जानवारी २०२३ ला जल्लोष कार्यक्रम होणाऱ्या ठिकाणांवर व्हिडिओग्राफी पथकाद्वारे नजर ठेवण्यात येणार आहे. विदेशी पर्यटक महिलांची तसेच परराज्यातून येणाऱ्या महिलांची छेडछाड होणार नाही, यासाठी विशेष महिला पथकांची नियुक्ती करण्यात आली असून या पथकामार्फत लक्ष देण्यात येणार आहे.

जिल्ह्याची पर्यटन जिल्हा म्हणून असणारी ओळख लक्षात घेता अनेक ठिकाणी २०२३ या नववर्षाच्या स्वागताचा आनंदोत्सव साजरा होणार आहे. या कालावधीध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलिस दलाने अॅक्शन प्लॅन तयार केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular