विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत भारताने गुरूवारी विजयाचा चौकार ठोकला. बांगलादेशने दिलेले विजयासाठी दिलेले २५७ धावांचे आव्हान लिलया पेलत भारताने बांगलादेशचा ७ गडी राखून दणदणीत पराभव केला. भारताचा या स्पर्धेतील हा सलग चौथा विजय आहे. कर्णधार रोहित शर्मा याने आक्रमक सुरूवात करत भारतीय विजयाचा पाया रचला. अवघ्या ४० चेंडूत ४८ धावा चोपल्यानंतर कर्णधार माघारी परतला. सुभमन गिलने देखिल ५५ चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ५३ धावांची खेळी केली. विराट आणि श्रेयश अय्यरने संयमी खेळी खेळत तिसऱ्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. विराट कोहलीने ४८ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. षटकार खेचत विराटने अर्धशतक पूर्ण करताना भारताच्या विजयावरून शिक्कामोतब केले.
बांगलादेशचा डाव गडगडला – दरम्यान त्या आधी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी स्विकारणाऱ्या बांगलादेशला मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले. धडाकेबाज सुरूवात केल्यानंतरही बांगलादेशाला केवळ २५६ धावांच करता आल्या. त्यासाठी त्यांचे आठ फलंदाज बाद झाले. सलामविरांनी ९३ धावांची भागीदारी केली. तेव्हा बांगलादेशचा संघ ३०० च्या आसपास धावसंख्या उभारली असे वाटत होते. तनझीद हसन याने ५१ तर लिंटनदास याने ६६ धावा केल्या बांगलादेशच्यावतीने २४ वर्षातील ही सर्वोत्तम सलामिची भागीदारी ठरली. कुलदीप यादवने ही जोडी फोडली. हसनला त्याने पायचित केले त्या पाठोपाठ जडेजाने नजमूल शांतोला पायचीत करत दुसरा धक्का दिला. त्यानंतर ठरावीक अंतराने बांगलादेशच्या विकेट पडत गेल्या. शेवटी ५० षटकात ८ बाद २५६ अशा धावसंख्येवर बांगलादेशचा संघ थांबला.