27.1 C
Ratnagiri
Saturday, July 27, 2024

कोकणातील मच्छीमार सहकार संस्था बंद होण्याच्या स्थितीतः आ. साळवी

रत्नागिरी जिल्हयातील मच्छीमारांच्या समस्या व मागण्यांबाबत मत्स्यव्यवसाय...

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण होणार, वीर ते चिपळूण पहिला टप्पा करण्याचा निर्धार

कोकण रेल्वेचे दुपदरीकरण टप्प्याटप्यांनी करण्याचा निर्णय घेण्यात...

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे कमावण्याचे आमिष दाखवुन फसवणूक

शेअर्स मार्केट मधून भरपूर पैसे मिळवून देण्याचे...
HomeChiplunमोदी सरकारच्या काळात महिलांची असुरक्षितता वाढलीयः रोहिणी खडसे

मोदी सरकारच्या काळात महिलांची असुरक्षितता वाढलीयः रोहिणी खडसे

विविध पदावरील नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

केंद्रात व राज्यात असलेल्या भारतीय जनता पार्टी म्हणजे भ्रष्टाचार जुमला पार्टीच्या सत्ताकाळात देशातील महिलांचा, अवमान होत आहे व महिलांची असुरक्षितता वाढली आहे. सोमवारी रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापना झाली मात्र या सोहळ्यात देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा देखील समावेश केला नाही. यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही, अशा भावना शरद पवार गट राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश अध्यक्षा रोहिणी खडसे यांनी चिपळूण येथील जिल्हा महिला आढावा बैठकीत व्यक्त केल्या. चिपळुणातील माटे सभागृहात राष्ट्रवादीचा (शरद पवार गट) जिल्ह्यातील महिलांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी विविध पदावरील नव्याने नियुक्त करण्यात आलेल्या महिला पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

व्यासपीठावर प्रांतिक प्रदेश उपाध्यक्ष माजी आ, रमेश कदम, विभागीय अध्यक्षा भावना घाणेकर, जिल्हा निरीक्षक बबन क़नवाजे, प्रदेश उपाध्यक्ष कुमार शेटे, सरचिटणीस बशीर मुर्तुझा, माजी महिला जिल्हाध्यक्षा नलिनी भुवड, प्रदेश उपाध्यक्षा सुजाता तांबे, जिल्हाध्यक्ष सुरेश बने, जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश शिगवण, अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष रईस अलवी, डॉक्टर सेलचे प्रदेश उपाध्यक्ष डॉ. संतोष दाभोळकर, महिला जिल्हाध्यक्षा दीपिका कोतवडेकर, उपजिल्हाध्यक्षा रुकसार अलवी, चिपळूण तालुकाध्यक्षा राधा शिंदे, शहर अध्यक्षा डॉ. रेहमत जबले आदी उपस्थित होते. रोहिणी खडसे यावेळी म्हणाल्या, हा देश व राज्य माता जिजाऊ, अहिल्या होळकर, राणी लक्ष्मीबाई अशा पराक्रमी व सुसंस्कृत महिलांचा वारसा सांगणारा आहे. त्यांनी घडविलेल्या पिढीचा वारसा पुढे चालू आहे.

अशा या पराक्रमी महिलांच्या देशात व राज्यात आज भ्रष्टाचार जुमला पार्टीकडून महिलांचा अवमान होत आहे. महिला असुरक्षित आहेत. देशभरात राम मंदिर कार्यक्रमाचा जल्लोष सुरू असताना त्यामध्ये एकाही महिलेचा सहभाग दिसून आला नाही, यासारखी दुर्दैवी गोष्ट नाही. आज महिला विविध समस्या व अडचणींचे अग्नीदिव्य सहन करीत आहेत. त्यांचा वनवास संपत नाही. हे सर्व थांबवायचे असेल तर येत्या निवडणुकीत महिलांनी आपली ताकद सत्ताधारी पक्षाला दाखवून द्यावी. महिलांची ताकदच देशातील सत्तेत बदल घडवू शकते. भाजपकडे भ्रष्टाचारी धुवून काढण्याचे वॉशिंग मशिन आहे. त्यांच्यात गेलेला धुतल्या तांदळासारखा स्वच्छ होतो. आता त्यांचे वॉशिंग मशिन बंद करण्यासाठी महिलांनी सत्ताबदलासाठी धोपाटण्याचा वापर करून भ्रष्टाचार जुमला पार्टीला धुवून काढा, असे आवाहन केले.

RELATED ARTICLES

Most Popular