26.9 C
Ratnagiri
Monday, July 7, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeMaharashtraजुहू किनाऱ्यावरील दुर्दैवी घटना, तिघांचा बुडून मृत्यू

जुहू किनाऱ्यावरील दुर्दैवी घटना, तिघांचा बुडून मृत्यू

काल संध्याकाळी शोध कार्यात उशीर झाल्याने पुन्हा आज बुधवारी सकाळी नौदलाच्या डाइव्हर्सनी शोधमोहिमेला सुरूवात केली होती.

जुहू समुद्र किनाऱ्यावर काल दोन सख्ख्या भावांसह तिघेजण काल समुद्रात बेपत्ता झाले होते. त्यांचे मृतदेह आज नौदलाच्या डाइव्हर्सनी शोधले. आज बुधवारी सकाळी बेपत्ता मुलांचा शोध सुरू करण्यात आला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल संध्याकाळी शोध कार्यात उशीर झाल्याने पुन्हा आज बुधवारी सकाळी नौदलाच्या डाइव्हर्सनी शोधमोहिमेला सुरूवात केली होती. तिघांपैकी दोन सख्खे भाऊ आणि एक जण त्यांचा मित्र असे तिघेही मंगळवारी दुपारी जुहू किनाऱ्यावर बुडाले होते. मंगळवारी तीन वाजल्यापासून हेलिकॉप्टरच्या मदतीने तिघांचा शोध सुरू होता. मात्र रात्री अंधार झाल्याने अखेर साडे सात वाजता शोधमोहिम थांबवण्यात आली होती. वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मृतदेह कूपर रुग्णालयात नेण्यात आले. या प्रकऱणी अपघाती मृत्यूची नोंद केली असून शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.

बुडून मृत्यू झालेल्यांमध्ये कौस्तुभ गणेश गुप्ता वय १८ आणि प्रथम गणेश गुप्ता वय १६ या दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. तर अमन सिंग वय २१ या त्यांच्या मित्राचाही या दुर्घटनेमध्ये दुर्दैवी अंत झाला आहे. तिघांचा आणखी एक मित्र अभिषेक जोगेंद्र शर्मा देखील त्यांच्या सोबत होता. परंतु, अचानक आलेल्या मोठ्या लाटेमुळे तो बाहेर पडल्याने त्याचे प्राण वाचले. जेव्हा आपले इतर मित्र दिसले नाहीत तेव्हा अभिषेकने याबाबतची माहिती लाइफगार्ड्सना दिली. त्यानंतर आपत्ती व्यवस्थापन विभागाला कळवण्यात आले. बीएमसीच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नौदलाच्या हेलिकॉप्टर्सची मदत घेत शोध सुरू केला होता. आज त्यांचे मृतदेह मिळाले आहेत.

RELATED ARTICLES

Most Popular