26.4 C
Ratnagiri
Friday, October 18, 2024

अखिल शेओरानचे लक्ष्य कांस्यपदक, दुसरे पदक भारताच्या झोळीत

ISSF विश्वचषक फायनल भारताची राजधानी नवी दिल्ली...

महिला मतदार ठरवणार दापोलीचा आमदार दापोली मतदारसंघ

विधानसभा निवडणूक जाहीर झाली असून, सर्वांनी आचारसंहितेचे...
HomeRatnagiriजिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजन

जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजन

दरवर्षी पर्यावरण दिना निमित्त अनेक शाळांमध्ये उपक्रम राबविले जातात. पण सध्या कोविडच्या संसर्गामुळे शाळा, कॉलेज बंद असल्याने ऑनलाईन शिक्षण  सुरु आहे. पर्यावरण दिनाचे औचित्य साधून अपेडे येथील कदम फाउंडेशन संस्थेतर्फे शालेय विद्यार्थ्यांसाठी जिल्हास्तरीय चित्रकला स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. हि स्पर्धा तीन गटामध्ये घेण्यात येणार असून, दि. १८ जून पर्यंत विद्यार्थ्यासकट चित्राचा फोटो गुगल फॉर्म किंवा व्हाट्सअँप नंबरवर पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धा तीन शैक्षणिक वयोगटामध्ये घेतली जाणार आहे. तसेच प्रत्येक गटाला अनुसरून विषय देण्यात येणार आहेत. पहिला गट हा ७ वर्षापर्यंत असून या गटासाठी झाडे, फुले, फळे आणि निसर्ग चित्र यापैकी कोणताही एक विषय निवडून चित्र काढायचे आहे. दुसरा गट हा वयोगट ८ ते ११ वर्षे मुलांसाठीचा आहे. या वयोगटासाठी अशी असावी बाग किंवा माझा आवडता ऋतू हा विषय देण्यात आला आहे. तिसरा वयोगट १२ ते १५ वर्षे मुलांसाठी असून, त्यांना निसर्ग आपला मित्र किंवा माझ्या स्वप्नातील गाव हे विषय देण्यात आळे आहेत. ज्या विद्यार्थ्यांना या जिल्हास्तरीय स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचे आहे त्यांनी  त्यांनी आपल्या वयोगटानुसार विषय निवडून चित्र काढायचे आहे.

चित्र रंगविण्यासाठी कोणत्याही माध्यमाचा वापर केला तरी चालेल. चित्र A३ किंवा A४ आकाराच्या कोऱ्या कागदावर काढायचे आहे. चित्र स्वतः काढलेले असावे. प्रत्येक वयोगटातून ३ क्रमांक काढण्यात येणार आहेत. १८ जून २०२१ पर्यंत चित्राचा फोटो आणि विद्यार्था बरोबर चित्राचा होतो गुगल फॉर्म किंवा व्हाट्सअप नंबर वर पाठवा आणि सोबत विद्यार्थ्याची संपूर्ण माहिती भरण्यात यावी.

Kadam foundation Apede Drawing Compition

प्रत्येक सहभागी स्पर्धकाला प्रमाणपत्र तसेच प्रथम क्रमांक विजेत्याला १००० /-रु, द्वितीय क्रमांकाला ७००/-रुपये, तृतीय क्रमांकाला ५००/- रुपये अशी बक्षिसे देण्यात येणार आहेत.

तसेच स्पर्धेसाठी पाठविण्यात येणारे चित्र गुगल फॉर्मच्या सहाय्याने पाठविण्यसाठी

https://forms.gle/RjwQWdYEhPNkdDbD6

या लिंक वर जाउन अपलोड करण्यात यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

सदर स्पर्धेमध्ये जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवायचा आहे. स्पर्धेच्या बाबतीतील अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या संस्थेच्या ९६२३४९३०४९ या संपर्क क्रमांकावर फक्त व्हाट्सअप द्वारे संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular