29.8 C
Ratnagiri
Friday, March 29, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeSindhudurgमाझ्या विचाराचा सरपंच निवडून आला तरच, मिळेल गावच्या विकासाला निधी

माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला तरच, मिळेल गावच्या विकासाला निधी

नितेश राणेंच्या या विधानावरुन आता त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. तर शिंदे गट आणि भाजपा मात्र नितेश राणेंची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

भाजपा आमदार नितेश राणे यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. कणकवली नांदगाव इथल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या प्रचारादरम्यान आमदार नितेश राणे बोलत होते. यावेळी बोलताना ते म्हणाले, “माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर गावच्या विकासाला निधी देणार नाही. तुम्ही याला धमकी समजा नाहीतर अन्य काही. या व्हिडिओमुळे सध्या नवा वाद उदभवण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यांनी ग्रामपंचायत निवडणुकी दरम्यान मतदारांना दमदाटी केल्याचं समोर आलं आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नांदगाव ग्रामस्थांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.

दुपारी तीन वाजता नांदगाव तिठा येथे प्रचार सभेत भाषण करताना राणे यांनी, ‘मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री, जिल्हाधिकारी, माझ्या अधिकाराखाली आहेत. आम्हाला मतदान केले नाही तर सरकारचा एकही रुपयाचा निधी नांदगाव गावासाठी दिला जाणार नाही,’ असे म्हटले. त्याची व्हीडीओ क्लिपही व्हायरल झाली आहे.

राणे पुढे म्हणाले, “निधी वाटप आता माझ्या हातात आहे हे लक्षात असुद्या. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, कोणताही मंत्री माझ्याशिवाय पुढे विकासकामं करूच शकणार नाही. माझ्या विचाराचा सरपंच निवडून आला नाही तर मी एक रुपयाचा ही निधी देणार नाही.” नितेश राणेंच्या या विधानावरुन आता त्यांच्यावर जोरदार टीका होऊ लागली आहे. तर शिंदे गट आणि भाजपा मात्र नितेश राणेंची बाजू सावरण्याचा प्रयत्न करत आहे.

या विरोधात ‘‘आम्हाला मतदान केले नाही तर सरकारचा एकही रुपयाचा निधी नांदगाव गावासाठी दिला जाणार नाही, असा इशारा देणाऱ्या आमदार नीतेश राणे यांच्यावर आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करावा,’’ अशी मागणी नांदगाव शिवसेना शाखाप्रमुख राजा म्‍हसकर यांनी कणकवली पोलिस निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. गुन्हा दाखल न झाल्‍यास आंदोलन छेडण्याचा इशाराही त्‍यांनी दिला. आचारसंहिता असताना अशा प्रकारे धमकी देऊन आमदार राणे यांनी आचारसंहितेचा भंग केला आहे.

RELATED ARTICLES

Most Popular