26.6 C
Ratnagiri
Wednesday, July 16, 2025

कशेडीत लोखंडी जाळ्यांचे ‘सुरक्षा कवच’

मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवाशांसाठी कायमची डोकेदुखी ठरलेल्या कशेडी...

धनुष्यबाण कुणाचा? निवडणुकांपूर्वी उध्दव ठाकरेंना मिळणार कौल?

१० दिवसांपूर्वी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे...

सरपंचपदाचे आरक्षण जाहीर होताच काहीजण आनंदित, अनेकांचा हीरमोड

जिल्हयात सोमवारी सरपंचपदाच्या आरक्षणाची लॉटरी निघाली. त्यानंतर...
HomeRatnagiriकरूळ - भुईबावडा घाट वाहतुकीसाठी बंद - प्रवाशांची गैरसोय

करूळ – भुईबावडा घाट वाहतुकीसाठी बंद – प्रवाशांची गैरसोय

तब्बल ९ महिने हा घाट मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे.

गेले कित्येक महिने वैभववाडी तालुक्यातील करूळ व भुईबावडा दोन्हीही घाट मार्ग वाहतुकीस बंद असल्यामुळे त्याचा मोठा फटका प्रवाशी, वाहतूकदार यांच्यासह व्यापाऱ्यांना बसत आहे. भुईबावडा घाटात अतिवृष्टीमुळे कोसळलेल्या मोरीचे बांधकाम अद्यापही सुरू असून अजून काही दिवस वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे, तर करूळ घाट मात्र अनिश्चित काळासाठी बंद आहे. दरम्यान भुईबावडा घाट पुन्हा १० ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिका-यांनी दिले आहेत. सध्या फक्त छोटया वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण यांना जोडणारे भुईबावडा व काळ पाट हे दोन्ही घाट वैभववाडी तालुक्यात येतात.

या दोन्हीही घाटातून मोठ्या प्रमाणात वाहतूक होते, करूळ घाटात वाहतुकीला अडसर आल्यास त्याला पर्यायी मार्ग म्हणून भुईबावडा घाटाकडे पाहिले जाते. तर भुईबावडा घाटात अडथळा आला तर करूळ घाटाचा पर्याय होता. पाटाच्या नूतनीकरण, कॉक्रिटीकरण कामासाठी २२ जानेवारीपासून तब्बल ९ महिने हा घाट मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्यात आला आहे. यादरम्यान प्रवासी वाहतुकीसह अवजड वाहतूकही वैभववाडी-उंबर्डे-भुईबावडा घाटमार्गे सुरू होती, यावर्षी पावसाळ्यात भुईबावडा घाटाने चांगली साथ दिली होती.

मात्र २६ सप्टेंबर रोजी घाट परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे पाटात अनेक ठिकाणी दरही कोसळल्यामुळे घाटाची दैना झाली. तर एक मोरी कोसळली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने जेसीबीच्या सहाय्याने पाटात ठिकठिकाणी कोसळलेल्या दरडी इठवून रस्ता मोकळा केला. सध्या घाटातून फक्त मोटरसायकल व हलकी वाहने सुरू असून मोरी कोसळल्यामुळे एसटीसह जड व अवजड वाहतूक पूर्णपणे बंद ठेवण्यात आली आहे.

व्यापाऱ्यांना फटका – करळ पाट बंदचा सर्वाधिक फटका या मार्गावरील वैभववाडी शहरातील व्यापाऱ्यांना बसला आहे. करूळ ते तळेरे दरम्यान महामार्गानजीक असलेली अनेक हॉटेल ग्राहकच नसल्यामुळे बंद आहेत. हॉटेल व्यावसायिकांवर उपास मारिची वेळ आली आहे. तसेच अन्य व्यापारावरही त्याचा मोठा परिणाम झाला आहे. याबाबत वाहतूकदार व व्यापाप्यांमध्ये तीव्र नाराजी असून प्रशासनाच्या वेळ काढू व हलगर्जीपणाच्या कारभाराबाबत तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.

१० ऑक्टोबरपर्यंत वाहतूक बंदच – अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. मात्र काम अद्याप पूर्ण झालेले नाही. त्यामुळे पुन्हा १० ऑक्टोबरपर्यंत अवजड वाहतूक बंद ठेवण्याचे आदेश दिलेआहेत. सध्या फक्त छोट्या वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र आणखी काही दिवस वाहतूक बंद राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे तालुक्यातून जाणारे हे दोन्हीही घाट मार्ग बंद असल्यामुळे प्रवाशी, वाहतूकदार, व्यापारी यांची मोठी गैरसोय झाली आहे.

उद्योगधंदा, व्यापार, आरोग्य, शिक्षण यासारख्या मूलभूत सुविधांसाठी कोकण हे पश्चिम महाराष्ट्रावर अवलंबून आहे. यासाठी दळणवळणासाठी करूळ व भुईबावडा घाट हे महत्वाचे मार्ग आहेत. मात्र करुळ घाटाच्या नूतनीकरणाच्या नावाखाली तब्बल ९ महिने तळेरे-कोल्हापूर हा राष्ट्रीय महामार्ग बंद ठेवण्यात आला आहे. राष्ट्रीय महामार्ग इतकेमहिने बंद ठेवता येतो का? असा प्रश्न आता विचारला जात आहे. करुळ घाटाचे काम धिम्या गतीने सुरु आहे. करूळ घाट बंद असूनही ज्या गतीने काम अपेक्षित आहे त्या गतीने होताना दिसत नाही.

RELATED ARTICLES

Most Popular