26.2 C
Ratnagiri
Sunday, April 20, 2025

चर्मालयात व्हावा तातडीने सेवारस्ता, मिऱ्या-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण

शहरातून जाणाऱ्या मिऱ्या-नागपूर महामार्गाचे काम युद्धपातळीवर सुरू...

जनता दरबारात माहिती घेऊनच या – मंत्री उदय सामंत

जनतेच्या प्रश्नापेक्षा दुसरे काही मोठे काम असू...
HomeChiplunमाजी मंत्री रामदासभाईचा ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल…

माजी मंत्री रामदासभाईचा ठाकरे पिता-पुत्रावर हल्लाबोल…

काकाच्या पाठीत खंजीर खुपसला.

डोक्याला कफन बांधून ५५ वर्षे शिवसेनेसाठी काम केलं त्याच मला काय प्रायश्चित मिळालं? असा सवाल करत माजी मंत्री रामदास कदम यांनी पुन्हा एकदा ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर शरसंधान केले आहे. मी मंत्री असताना आदित्य ठाकरे माझ्या केबिनला येऊन बसायचा. काम चालतं कसं ते सगळं शिकून घेतलं. मला काका म्हणायचा आणि काकाच्या पाठीत खंजीर खुपसला. माझं खाते घेऊन बसला तुमचा मुलगा, अशा शब्दात त्यांनी आपले दुःख मांडलं. खेड तालुक्यात रविवारी बीजघर येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी जिल्हाप्रमुख शशिकांत चव्हाण, अजितदादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाप्रमुख बाबाजी जाधव व आदी पदाधिकारी उपस्थित होते.

अतिशय आक्रमकपणे त्यांनी यावेळी आपली खंत मांडली. पन्नास खोक्याच्या आरोपाचाही त्यांनी समाचार घेतला. एका तरी आमदाराने पन्नास खोके घेतले असल्याचे सिद्ध करा, मी तुमच्या घरी येऊन भांडी घासेन, असं थेट आव्हान उद्धव ठाकरे यांना दिलं होतं, याचं पुढे काय झालं? असा सवाल त्यांनी केला. फक्त ४० आमदारांना बदनाम करण्यासाठी ते कट कारस्थान होत, असा हल्लाबोलही त्यांनी केला आहे. शिवसेना अशीच मोठी झाली नाही.

त्यासाठी आजवर अनेकांनी रक्त सांडले आहे. बाळासाहेबांच्या एका शब्दासाठी अनेक लोक जीव द्यायला तयार असायचे. त्यांना इतकं प्रेम मातोश्रीवरती मिळत होतं. पण आज अवस्था काय आहे? शिवसेना मोठी करण्यासाठी सगळ्यात मोठे योगदान कोकणचे आहे. पण त्याच कोकणी माणसाला, कोकणातल्या नेतृत्वाला संपविण्याचे पाप उद्धव ठाकरे यांनी केलं, अशा शब्दात रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर तोफ डागली आहे. यावेळी आ. योगेश कदम यांनीही आपले विचार मांडले.

येथे उद्योग आले पाहिजेत, रोजगार निर्माण झाले पाहिजेत, यासाठी आपण प्रयत्न सुरू केले आहेत. महिलांना ताकद देण्यासाठी महिलांच्या बचत गटांना अगरबत्तीचा कारखाना सुरू करून दिला आहे. बचत गटातील उत्पादित होणाऱ्या मालाला मार्केट मिळावं यासाठीही प्रयत्न सुरू केले आहेत. मंडणगड येथे एक हजार एकरची मोठी एमआयडीसी मंजूर करून घेतली आहे, अशी माहिती देत पुढील काळात मतदारसंघात उद्योग न रोजगार हे आपल्या लक्ष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितलं. या मेळाव्यास शिवसैनिक, पदाधिकारी, महिला आघाडी, युवासैनिक आणि सातगाव पंचक्रोशीतील महिला भगिनी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES

Most Popular