31.2 C
Ratnagiri
Thursday, March 28, 2024

कातकरी कुटुंबीयांसाठी ‘शासन आपल्या दारी’

चिपळूण तालुक्यात वर्षानुवर्षे वास्तव्यास असलेल्या; परंतु अधिकृत...

चिपळुणातील वृद्ध महिलेच्या खुनाला वाचा फुटली

वालोपे येथे झालेल्या वृद्ध महिलेच्या खुनाला अखेर...

किरण सामंतांनी घेतले ना. नारायण राणेंचे आशीर्वाद…

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून भाजपचे जेष्ठ नेते...
HomeRajapurखारेपाटण वीज उपकेंद्रातील आग प्रकरणी, पंधरा तासानंतर वीज पुरवठा पूवर्वत

खारेपाटण वीज उपकेंद्रातील आग प्रकरणी, पंधरा तासानंतर वीज पुरवठा पूवर्वत

खारेपाटण अतिउच्च दाब उपकेंद्राच्या आयसीटीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ऑईलने पेट घेतल्याने आग लागल्‍याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

खारेपाटण येथे काल लागलेल्या वीज उपकेंद्रातील आगीचा सर्वाधिक फटका मालवण, देवगड आणि वैभववाडीतील वीज ग्राहकांना बसला आहे. या तीन तालुक्‍यातील अनेक ग्राहकांना संपूर्ण रात्र अंधारात काढावी लागली. खारेपाटण अतिउच्च दाब उपकेंद्राच्या आयसीटीमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे ऑईलने पेट घेतल्याने आग लागल्‍याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या आगीमध्ये उपकेंद्रातील कंट्रोल केबल जळल्या असून परिणामी कणकवली, मालवण, देवगड आणि वैभववाडी तालुक्‍याचा वीज पुरवठा खंडित झाला होता. अर्ध्या तासानंतर कणकवली तालुक्‍याचा वीज पुरवठा पूवर्वत झाला; मात्र इतर भागातील जसे देवगड, वाडा, खारेपाटण, कुंभारमाठ, पेंडूर, आचरा, तळेबाजार, जामसंडे आणि वैभववाडी या उपकेंद्रावरील ग्राहक मात्र वीज पुरवठा सुरु न झाल्याने अंधारातच राहिले

खारेपाटण येथील अतिउच्चदाब वीज उपकेंद्रातील ट्रान्स्फॉर्मरला सायंकाळी पावणे पाचच्या सुमारास आग लागली होती. तासाच्या अथक प्रयत्‍नानंतर आग आटोक्‍यात यश आले;  मात्र जिल्ह्यातील १ लाख २० हजार ग्राहकांचा वीज पुरवठा बंदच ठेवण्यात आला होता. पंधरा तासाच्या प्रयत्‍नानंतर आज सकाळी ७.१० ला सर्व वीज ग्राहकांचा वीज पुरवठा पूवर्वत झाल्‍याची माहिती महावितरणकडून देण्यात आली आहे.

त्‍यामुळे या ग्राहकांच्या घरातील दिवे पुन्हा प्रकाशमान झाले. दरम्यान, महावितरणच्या सहाय्याने वीजपुरवठ्यासाठी विविध मार्गाचा अवलंब करण्याचा खटाटोप सुरू होता. सिंधुदुर्गनगरी व ओरोस येथील जिल्हा केंद्राचा वीजपुरवठा अडीच ते तीन तासात तातडीची पर्यायी व्यवस्था करून पूर्ववत केला होता. त्यासाठी कणकवली अतिउच्च दाब उपकेंद्रातील १६ एमव्हीए क्षमतेच्या एका पॉवर ट्रान्सफॉर्मरला ११० केव्ही राधानगरी अतिउच्च दाब उपकेंद्रावरून वीज पुरवठा केल्याची माहिती महावितरणच्या अधिकाऱ्यांनी दिली.

RELATED ARTICLES

Most Popular