खेड तालुक्यात घडलेल्या या आकस्मित घटनेने जिल्हा हादरला आहे. सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढल्याने तसेच उदरनिर्वाह करण्यासाठी मिळेल ते काम करत असतात. त्यातील काही समाजातील लोक घरोघरी जाऊन देवीच्या नावाने जोगवा मागतात आणि त्यामध्ये काही अन्न धान्य, पैसे मिळतील त्यावर आपली गुजराण करताना दिसतात. आणि लोकसुद्धा अशा जोगवा मागणाऱ्या लोकांना काही ना काही तरी देऊनच पुढे पाठवतात. त्यांना खेड मध्ये अशाच एका महिलेवर एका मद्यपीने अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला आहे.
खेड तालुक्यातील भरणे नाका परिसरातील एका मंदिरांच्या प्रांगणात जोगवा मागून उदरनिर्वाह करणारी पत्नी आणि तिचा पती झोपले होते. मध्यरात्रीच्या सुमारास तिथे मद्यपान केलेल्या इसमाने त्या महिलेवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. झोपेतून जागे झालेल्या त्या महिलेने आरडाओरड केल्याने तिच्या शेजारी झोपलेला नवऱ्याला देखील जाग आली. यावेळी त्या महिलेच्या पतीने अतिप्रसंग करणाऱ्याला अटकाव केला असता त्याने पतीच्या डोक्यात दंडका घालून त्याला गंभीर जखमी केले. दांडक्याचा वार एवढा जबरदस्त होता कि, त्या महिलेचा जखमी पती सध्या रत्नागिरी येथील शासकीय रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे. या घटनेनंतर फरार झालेल्या आरोपीचा खेड पोलीस शोध घेत आहेत.
नवऱ्याने अतिप्रसंग करणाऱ्या इसमाला जाब विचारला असता दोघांमध्ये धक्काबुक्की झाली. यावेळी त्या मद्यपी इसमाने एका लाकडी दंडक्याचा प्रहार पतीच्या डोक्यावर केल्याने तो गंभीर जखमी झाला. त्या नंतर अंधाराचा फायदा घेत तो इसम घटनास्थळावरून फरार झाला. खेड पोलीस स्थानकाच्या हद्दीतील भरणे नाका परिसरात घडलेल्या या घटनेमुळे पोलीस त्या आरोपीचा कसून तपास घेत आहेत.