30.6 C
Ratnagiri
Thursday, April 25, 2024

माझ्या जीवात जीव असेपर्यंत काम करत राहणारः सुनिल तटकरे

निवडणूका येतात जातात, मात्र आम्ही जनतेच्या कामासाठी...

अमित कदम यांचा राष्ट्रवादी पवार गटात कार्यकर्त्यांसह प्रवेश

महाराष्ट्रीय यादव चॅरिटेबल ट्रस्टचे श्रीकृष्ण हॉल, नायगाव...

…तर बेरोजगारी कशी दूर होणार, प्रमोद जठार

महाविकास आघाडीतील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसने जाहीरनाम्यामध्ये...
HomeKhedखेड मधील अल्पवयीन मुलीचे शोषण केलेल्या आरोपीला २० वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा

खेड मधील अल्पवयीन मुलीचे शोषण केलेल्या आरोपीला २० वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा

आरोपी रोहीत राजेंद्र सावंत याच्याविरुद्ध तपास करून त्यांच्यावर खेडच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

खेड येथे अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण करून, सामुहिक बलात्काराच्या गुन्ह्यात दोषी ठरवून आरोपीला जिल्हा सत्र न्यायालयाचे २० वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली. पीडित अज्ञान मुलीचे लैंगिक शोषण करून, तिच्यावर सामुहिक बलात्कार प्रकरणाच्या गुन्ह्यात आरोपी रोहीत राजेंद्र सावंत रा. वेरळ ता. खेड जि. रत्नागिरी याच्याविरुद्ध सबळ पुरावा प्राप्त झाल्याने त्याला दोषी ठरवून खेड अतिरिक्त सत्र जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. आवटे यांनी २० वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

तसेच १०००/- रू. दंड व दंड न भरल्यास २ आठवडे सश्रम कारावास,  भादवि ३५४ अन्वये १ वर्षाचा सश्रम कारावास,  भादवि ४५० अन्वये ३ वर्षाचा सश्रम कारावास व ५००/- रू दंड,  भादवि ३५२ अन्वये १ वर्षाचा सश्रम कारावास, भादवि ५०६(१) अन्वये ६ महिन्याचा सश्रम कारावास व बाल लैंगिक कायदा ६ अन्वये १० वर्षाचा सश्रम कारावास व ५००/- रू दंड व दंड न भरल्यास सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड मृणाल जाडकर यांनी काम पाहीले.

पीडित अज्ञान मुलीचे लैंगिक शोषण करून, तिच्यावर सामुहिक बलात्कार केल्याप्रकरणी खेड पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर २५२/२०१६  मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा अधिक तपास तपासनीस अंमलदार तात्कालीन सपोनि चंद्रकांत लाड यांनी तात्कालीन निरीक्षक जांभळे,  तात्कालीन डिवायएसपी एम एस. गावडे, पोलीस निरीक्षक निशा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली करून आरोपी रोहीत राजेंद्र सावंत याच्याविरुद्ध तपास करून त्यांच्यावर खेडच्या अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.

सन २०१७ पासून गुन्ह्याची सुनावणी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयासमोर सुरू होती. सरकारी पक्षाच्या वतीने ॲड मृणाल जाडकर यांनी साक्षीदार तपासले. त्यांनी आरोपीच्या विरोधात सबळ पुरावा प्राप्त करून व केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी रोहीत राजेंद्र सावंत याला दोषी ठरवून जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए एस आवटे यांनी पीडित अज्ञान मुलीचे लैंगिक शोषण करून, सामुहिक रोहीत राजेंद्र सावंत याच्याविरुद्ध सबळ पुरावा प्राप्त झाल्याने दोषी ठरवून आरोपीला भादवि २७६ (ड) अन्वये २० वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली.

RELATED ARTICLES

Most Popular