24.6 C
Ratnagiri
Sunday, November 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeLifestyleलहान मुलाचं मोबाईल व्यसन, वेळीच घ्या खबरदारी

लहान मुलाचं मोबाईल व्यसन, वेळीच घ्या खबरदारी

हल्लीच्या लहान मुलांपासून ते तरुणाईमध्ये मोबाईलचं व्यसन मोठ्या प्रमाणात वाढत चालले आहे. मोबाईलमुळं मुलांचे बाहेरील मैदानी खेळांपासून लक्ष दुर्लक्षित होत चालले असल्याचं समोर येत आहे. मैदानी खेळ खेळण्याऐवजी मुलं दिवस रात्र मोबाईलमध्ये गेम्स खेळण्यात, व्हिडीओ बघण्यात व्यस्त राहत असल्याचं दिसून येतं. त्यामुळे मुलांची शारीरिक हालचाल पूर्णत: थांबली असून, हे मुलांच्या विकासासाठी घातक असल्याचं तज्ञ वारंवार सांगत असतात.

आजकाल ऑनलाईन शिक्षणामुळं मोबाईल मुलांना देणे भाग आहे. परंतु, आपल्या मुलांना आवश्यक असेल तेव्हाच मोबाईल देणं गरजेचं आहे. स्मार्टफोन आल्यापासून त्याचा वापर अधिक प्रमाणात वाढलेला आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत मोबाईलच्या विळख्यात अनेक जण जखडली जात आहेत. यात लहान मुलांच प्रमाण जास्त आहे. बराच वेळ मोबाईलमध्ये गुंतलेली हि मुले दिसून येतात.

लहान मुलं अनेकदा हट्ट करतात किंवा मोठ्यानं रडतात अशावेळी त्यांचे पालक आपल्याकडील स्मार्टफोन काढून त्यांच्या हातात देतात आणि त्यांना त्यावेळी गप्प करतात. आजकाल हे दृश्य आपल्याला प्रत्येक घरामध्ये दिसून येते. पण असं करणं कितपत योग्य आहे!

एका जागतिक संशोधनातून देखील ही गोष्ट समोर आली आहे. अमेरिकेमधील एका लहान मुलांवर अभ्यास करणाऱ्या अकादमीने याबाबत काही दिशा निर्देश जारी केले आहेत. यानुसार, डिजिटल मीडियाचा जास्त वापर यामुळे मुलांची झोप, त्यांचा विकास आणि शारीरिक स्वास्थ बिघडविण्यास कारणीभूत ठरु शकतो. संशोधकांचं म्हणणं आहे की, पालकांनी आपल्या चिमुकल्यांना स्मार्टफोन अथवा डिजिटल उपकरणं देणं जेवढ टाळता येईल तेवढ टाळाव.

अमेरिकेतील मिशिगन विद्यापिठाचे बालरोग रुग्णालयाचे प्रमुख लेखक जेनी रडेस्की यांचं म्हणणं आहे की,  अशाप्रकारचे इलेक्ट्रोनिक उपकरणं वापरल्यानं मुलांच्या सहनशीलतेच्या भावना देखील कमी होऊ लागतात. रडेस्की यांच्या मते, सध्या डिजिटल मीडिया हा अनेक चिमुकल्यांचा शाळेपासूनच अनिवार्य भाग बनला आहे. पण त्यामुळे त्याच्या बुद्धीविकासावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. लहानपणी मुलांच्या बुद्धीचा विकास हा वेगाने होतो. त्यामुळे या कोवळ्या वयामध्ये त्यांना अशा उपकरणांपासून थोडं लांब ठेवलेलच चांगले, फक्त गरजेपुरतेच द्यावे.

RELATED ARTICLES

Most Popular