24.6 C
Ratnagiri
Sunday, November 9, 2025

रेशन दुकानदारांची दिवाळी ‘कडू’, पालकमंत्र्यांना निवेदन देणार

जिल्ह्यातील रेशन दुकानदारांचे जुलै महिन्यापासून थकलेले कमिशन...

४४ कोटींच्या डांबर खरेदीत अनियमितता – बाळ माने

रत्नागिरी पालिकेत २०१४ ते २३ या कालावधीत...

खेर्डी-टेरव मार्ग होणार खड्डेमुक्त, बांधकाम विभागाचे आश्वासन

पुढील पंधरा दिवसांत खेर्डी-टेरव रस्त्यावरील सर्व खड्डे...
HomeChiplunचिपळूणचा जाणता राजा पुन्हा मैदानात…! ४० वर्षात जे पेरले ते उगवणारच : रमेशभाई कदम

चिपळूणचा जाणता राजा पुन्हा मैदानात…! ४० वर्षात जे पेरले ते उगवणारच : रमेशभाई कदम

नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत हे कळले त्याने त्याने त्यांना पाठिंबा दिला आहे.

सर्वसामान्य… कष्टकरी पिडीत….. एक्काचे दीनदुबळे, गोरगरिबांना चिपळूणमधील हकाचे ठिकाण म्हणजे शहरातील विरेश्वर कॉलोनी येथील जयेश बंगला येथे ना पक्ष विचारला जातो… ना धर्म, पंत, ना जात….. येथे फक्त बघितली जाते ती समोरच्याची अडचण आणि गरज. बस्स, तात्काळ मार्ग काढण्याच्या हालचाली सुरू होतात. गेली ४० वर्ष हा शिरस्ता जयेशवर अंबाधित आहे. म्हणूनच चिपळूणच्या जनतेने ज्यांना चिपळूणचा जाणता राजा ही पदवी बहाल केली आहे…… ते म्हपाजे माजी आमदार रमेशभाई कदम…… राजकारण करणे आणि राजकीय क्षेत्रात टिकून राहणे यामध्ये मोठा फरक आहे. राजकारणात अनेकजण येतात पण काळाच्या ओघात विस्मृतीत जातात. पण राजकीय क्षेत्रात तोच टिकतो ज्याची नाळ थेट सर्वसामान्य, गोरगरीब जनतेशी जोडली गेली आहे.

जो राजकारण कमी व दिवसरात्र समाजकारण करतो, त्यापैकीच एक म्हणजे रमेशभाई कदम यांचे नाव घ्यावे लागेल. एक कबड्डीपट्ट, नगरसेवक तब्बल साडेनऊ वर्ष नगराध्यक्ष ते आमदार असा त्यांचा प्रदीर्घ प्रवास राहिला. सकाळपासून रात्रीपर्यंत जनतेच्या सेवेत स्वतःला वाहून घेणारे नेतृत्व म्हणून विरोधकदेखील रमेशभाईंना आपला म ार्गदर्शक मानतात हीच जयेशवर सुरू असलेल्या सेवेची पावती म्हणावी लागेल. २४ ऑक्टोबर रोजी रमेशभाईंचा वाढदिवस साजरा होत आहे. यावेळचा वाढदिवस काहीसा वेगळा आणि उत्साहपूर्ण आहे. कारण जनतेच्या आग्रहास्तव चिपळूणचा जाणता राजा सर्वसामान्य जनतेसाठी पुन्हा एकदा मैदानात उतरण्याची तयारी करत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी मांडलेली ही अ त्यांची भूमिका.

नगराध्यक्ष निवडणूक लढवणार – वर्गासाठी खुले झाले आहे. चिपळूणचे नगराध्यक्षपद हे सर्वसाधारण मला स्वतःला नगराध्यक्षपदाची अभिलाषा कधीच नव्हती. कारण मी साडेनऊ वर्ष नगराध्यक्षपदावर होतो. राजकीय घडामोडी घडत असतात. त्याप्रमाणे काहीवेळा वाटचाल करावी लागते, पण सर्वसामान्य लोकांशी जोडलेली नाळ तुटता कामा नये, हे शरद पवार साहेबांनी दिलेले संस्कार कधीच विसरलो नाही. त्यामुळेच आज चिपळूण शहरातील शेकडो नागरिक स्वतः मला नगराध्यक्षपदासाठी उभे राहण्याचा आग्रह करत आहेत, त्यामुळे मी चिपळूण नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, अशा स्पष्ट आणि रोखठोक शब्दांत त्यांनी आपली भूमिका मांडली.

४० वर्ष पेरले ते उगवणारच – गेली ४० वर्ष मी जनतेसाठी अविरत काम केले आहे. कधीही सुट्टी घेतलेली नाही. माझ्याकडे आलेल्या व्यक्तीला कधीही पक्ष विचारला नाही किंवा कोणाला मतदान करतोस, कोणाचा कार्यकर्ता आहेस, असले प्रश्न कधीच विचारले नाहीत. जात, धर्म हा तर विषयच माझ्याकडे नाही. फक्त त्याची अडचण समजून घेऊन कुठून कशी मदत करता येईल त्यासाठी प्रयत्न करत राहिलो आणि आताही तेच करत आहे, पुढे देखील सुरू राहील, त्यामध्ये खंड पडणार नाही, असे मनमोकळेपणाने रमेशभाई म्हणाले.

हो ती घडी विस्कटलीय – चिपळूण नगरपरिषदेचा प्रदीर्घ अनुभव असलेले रमेशभाई म्हणाले, नगरपरिषदेच्या एकूणच कारभाराची घडी पूर्णपणे विस्कटली आहे. शहर विकासाच्या नावाखाली पैशाचा चुराडा करून स्वतःची घरे भरण्याचे काम झाले, त्यामुळे नगरपरिषदेची आर्थिक घडीदेखील विस्कटली आहे.

ते करून दाखवले कचरामुक्त – शहर हे शासनाचे धोरण रत्नागिरी जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्र राज्यात सर्वप्रथम चिपळूण शहरात राबवण्यात आले. ज्यावेळी कचरा प्रकल्पासाठी जागा घेतली त्यावेळी टोकाचे आरोप आमच्यावर झाले, चौकशा लागल्या, न्यायालयीन लढाई लढावी लागली. परंतु आम्ही मागे हटलो नाही. चांगला कचरा प्रकल्प उभा केला आणि कचरामुक्त चिपळूण शहर करून दाखवले. आज एक उत्तम असा कचरा प्रकल्प उभा असून त्याठिकाणी खतनिर्मितीदेखील होत आहे आणि त्याहीपेक्षा रोगराईचे प्रमाण शहरात कमी झाले याचे निश्चितच समाधान आहे.

तो कर अन्यायकारक – शहरात काही वॉर्ड असे आहेत, जिथे आजही कचरागाड्या जात नाहीत. त्यामुळे तेथील कचरा उचलता येत नाही. ते लोक स्वतःच कचऱ्याची विल्हेवाट लावतात, अशा नागरिकांकडून नगरपरिषद कचरा कर वसूल करते, तो कर अन्यायकारक असून त्याबाबत एक धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.

ब्लु-रेड लाईन विकासात खोडा – शहरावर लादलेली ब्लु व रेड लाईन ही पूररेषा म्हणजे शहर विकासात खोडा आहे. चिपळूण शहरासाठी पूर हा नवीन विषय नाही. एव्हाना आम्हाला पुराची सवय झालेली आहे. २०२१ मध्ये जो महापूर आला त्याचे कारण वेगळेच होते. त्या दोन दिवसात झालेला प्रचंड पाऊस, तसेच खेड, महाड येथील पुराचे पाणी दाभोळ खाडी ने घेतले नाही आणि त्यामुळे चिपळूणमधील पाणी वाहून जाण्यास अडचण झाली. साहजिकच चिपळूण शहरात प्रचंड  गवटा मारला गेला, हेदेखील एक कारण आहे. तसा महापूर दरवर्षी येतो असे नाही. त्यामुळे पुराच्या पाण्याचे कारण पुढे करून ब्लु व रैंड पूर रेषेचे नियंत्रण आणणे हे विकासाला बाधा आणणारे आहे. त्यासंदर्भात पाठपुरावा करावाच लागेल. अनेक समस्यांचा उल्लेख करत यावर उपाययोजना करण्याचे माझ्याकडे नियोजन आहे, असे सांगताना म्हणूनच आपण नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे, असेही रमेशभाई कदम यांनी सांगितले.

प्रचंड पाठिंबा – निवडणूक लढवण्याचा निर्णय रमेशभाईंनी ‘घेतल्यापासून अनेकांनी त्यांना पाठिंबा देण्यास सुरूवात केली आहे. ज्याला ज्याला ते नगराध्यक्षपदाची निवडणूक लढवणार आहेत हे कळले त्याने त्याने त्यांना पाठिंबा दिला आहे. मग पक्ष कुठलाही असो, नगराध्यक्ष रमेशभाईच ! असे अनेकजण सांगतात. आज त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांना लाख लाख शुभेच्छा आणि त्यांना दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना !

RELATED ARTICLES

Most Popular