22.7 C
Ratnagiri
Friday, November 22, 2024

OPPO Find X8, Find X8 Pro डायमेंसिटी 9400 प्रोसेसर, AMOLED डिस्प्लेसह लॉन्च…

OPPO ने अलीकडेच आपले फ्लॅगशिप स्मार्टफोन OPPO...

‘पुष्पा 2: द रुल’, अल्लू अर्जुनची जादू पुन्हा चालेल…

2021 च्या ब्लॉकबस्टर चित्रपट 'पुष्पा: द राइज'चे...
HomeRajapurलांजा, राजापुरात 'विकासाची गंगा' आणण्याचा मी 'वसा' व घेतला आहे व तो...

लांजा, राजापुरात ‘विकासाची गंगा’ आणण्याचा मी ‘वसा’ व घेतला आहे व तो पूर्ण करणार : किरण सामंत

अनेक मोठे प्रकल्प मार्गस्थ होण्यासाठी आम्ही परीश्रम घेतले.

“जनतेची कामे विनाविलंब झाली पाहिजेत यावर माझा नेहमी भर असतो. मी अहोरात्र काम करणार आहे. राजापूर, लांजा मतदार संघातील मतदार बंधू भगिनींसाठी मी अहोरात्र परीश्रम घेण्याचा ‘वसा’ घेतला आहे आणि मी घेतला वसा सोडणारा नव्हे! लांजा, राजापूरचा विकासाचा ‘बॅकलॉग’ भरुन काढण्यासाठी आणि लांजा, राजापुरात ‘विकासाची गंगा’ आणण्यासाठी मी अथक परीश्रम घेणार आहे” असे लांजा, राजापूरचे शिवसेनेचे उमेदवार श्री. किरण तथा भैय्या सामंत यांनी स्पष्ट केले. शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांची यादी कालच जाहीर झाली व या यादीत श्री. किरण तथा भैय्या सामंत यांचे नाव जाहीर झाले.

आज निवडणूक अर्ज – श्री. किरण तथा भैय्या सामंत हे गुरुपुष्यामृत योगाच्या शुभमुहूर्तावर गुरु. दि. २४ ऑक्टो. रोजी आपला निवडणूक अर्ज दाखल करणार आहेत. निवडणूक अर्ज दाखल करण्याच्या पूर्वसंध्येला पत्रकारांशी बातचीत करताना त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते उत्साहाने बोलत होते.

विकासाची गंगा दूर – श्री. किरण सामंत यांनी सांगितले की, “लांजा, राजापूर मतदार संघ काहीसा औद्योगिकदृष्ट्या मागास राहिला आहे. राजापुरात गंगेचे आगमन होत असले तरी लांजा, राजापूर ‘विकासाच्या गंगे’ पासून काहीसा दूर राहिला ही वस्तुस्थिती होय, परंतु या भूमीतील मंडळी अभ्यासू असल्याने येथील बंधू भगिनींनी विविध क्षेत्रात कर्तबगारी गाजविली” असे त्यांनी सांगितले.

भूमीपुत्रांची कर्तबगारी – त्यांनी पुढे सांगितले, “एक काळ असा होता की मुंबई हायकोर्टमध्ये लांजा, राजापुरातील मंडळींचा मोठा दबदबा होता. अनेक क्षेत्रात येथील मान्यवरांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला, परंतु लांजा, राजापूरला आधुनिक साज आला नाही, हा विभाग विकासापासून वंचित राहिला” असे त्यांनी नमूद केले.

काम करणारा नेता – श्री. किरण तथा भैय्या सामंत यांनी पुढे सांगितले, “माझ्या कार्याची पद्धत येथील मंडळींना पुरेपूर माहीत आहे. म्हणूनच आम्हाला ‘काम करणारा नेता हवा’ असे येथील माझ्या बंधू भगिनींचे म्हणणे आहे. त्यांच्या या प्रेमाच्या आग्रहाला मी ‘ओ’ दिला आणि येथे कामाला सुरुवात केली” असे त्यांनी विनम्र शब्दात सांगितले.

अनेक प्रकल्प मार्गस्थ ! – श्री. किरण सामंत शांत चित्ताने बोलत होते. त्यांनी सांगितले, “लांजा व राजापूर या दोन्ही ठिकाणी मागील काही वर्षांपासून मी काम करतो आहे. अनेक मोठे प्रकल्प मार्गस्थ होण्यासाठी आम्ही परीश्रम घेतले. साखरीनाटे मच्छिमार बंदर, जैतापूर उप जिल्हा रुग्णालय, पाचल सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल असे अनेक प्रकल्प आता होऊ घातले आहेत” याकडे त्यांनी लक्ष वेधले.

बंधू भगिनींचा ‘भैय्या’ – श्री. किरण सामंत यांनी पुढे सांगितले की, “मी सदैव काम करणारा, अहोरात्र झटणारा तसेच रात्री-बेरात्री देखील मदतीला धावून येण्यासाठी तत्पर असणारा असा येथील बांधवांचा ‘भैय्या’ म्हणजेच ‘भाऊ’ आहे. मी भाषणबाजी करीत नाही. ‘बाते कम, काम जादा’ या तत्वाने मी जातो” असे त्यांनी सडेतोडपणे सांगितले.

दमदार आत्मविश्वास – श्री. किरण सामंत तडफेने बोलत होते. त्यांनी सांगितले, “लांजा, राजापूरचा ‘बॅकलॉग’ भरुन निघावा, येथे ‘विकासाचीगंगा’ यावीव माझ्यावर भक्कम विश्वास दाखवणाऱ्या माझ्या येथील बंधू भगिनींना उत्तम प्रकारची ‘बरकत’ यावी यासाठी मी अहोरात्र परीश्रम घेणार आहे, माझ्या बंधू भगिनींचा माझ्यावरील विश्वास मी सार्थ करुन दाखविणार आहे… सर्वांच्या विश्वासाच्या बळावर मी आज भक्कम मताधिक्क्याने विजयी होण्यासाठी निवडणूक अर्ज दाखल करीत आहे” अशा दमदार शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली.

RELATED ARTICLES

Most Popular