25.2 C
Ratnagiri
Sunday, January 25, 2026

उपनगराध्यक्ष-अभियंता यांच्यात खडाजंगी रत्नागिरी नगरपालिका

रत्नागिरी नगरपालिकेच्या आवारात आज सायंकाळी उपनगराध्यक्ष समीर...

शहरातील अतिक्रमणांवर आज हातोडा रत्नागिरी पालिका आक्रमक

शहरातील अतिक्रमणाविरोधात पालिका आक्रमक झाली आहे. यातून...

दापोलीत ठाकरेंच्या उमेदवाराचा अर्ज अवैध

पंचायत समिती व जिल्हा परिषद निवडणुकीसाठी सुरू...
HomeRatnagiriदापोलीत सुरक्षित स्थळी स्थलांतरण प्रक्रिया सुरु

दापोलीत सुरक्षित स्थळी स्थलांतरण प्रक्रिया सुरु

हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यावरून रत्नागिरी जिल्हाधिकारी यांनी नागरिकांना ११ व १२ जून दरम्यान होणार्या अतिवृष्टी साठी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. तसेच मागील वर्षापासून आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे संपूर्ण कोकण किनारपट्टीला धोका निर्माण झाला होता. त्यामुळे अशा अतिवृष्टीमुळे काहीही आपत्कालीन संकट उद्भवू शकण्याची शक्यता असल्याने हे धोक्याचे २ दिवस जिल्ह्यामध्ये कर्फ्यू लावण्यात आला आहे.

रत्नागिरीतील दापोली तालुक्यामध्ये ज्या ठिकाणी लोकवस्तीमध्ये पावसाचे पाणी भरून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो, अशा एकूण १५ गावांमधील ५९३ कुटुंबातील २५१० नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित करण्याच्या कामकाजाचे नियोजन आज रात्री पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती दापोलीच्या तहसीलदार वैशाली पाटील यांनी दिली. तौक्ते वादळाच्या वेळी सुद्धा समुद्र किनार्यालगत राहणाऱ्या नागरिकांना आधीच सुरक्षित स्थळी स्थलांतरीत केल्याने तहसीलदार पाटील यांचे पूर्वनियोजन यशस्वी ठरले होते आणि येत्या २ दिवसांमध्ये  हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या इशाऱ्यानंतर तालुक्यातील महसूल प्रशासनातील अधिकार्यांना सोबत घेऊन गावातील ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, मंडल अधिकारी, पोलीस पाटील, तलाठी, सरपंच, लोक प्रतिनिधी तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिकांच्या सहाय्याने एकूण १५ गावातील नागरिकांना स्थलांतराच्या नोटीसा बजावून, त्यांच्या सुरक्षेखातर स्थलांतर प्रक्रिया सुरु करण्यात आल्याचे सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी ऑनलाइन घेतलेल्या बैठकीमध्ये या धोक्याच्या दिवसांमध्ये विशेष सतर्क राहून नागरिकांची काळजी घेण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले आहेत. जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाला योग्य सूचना देऊन सज्ज राहण्याचे आदेश दिले आहेत. अति पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती उद्भवली, कितीही मोठी आपत्ती आली तरी जिल्हा प्रशासन, नगरपालिका, पोलीस यंत्रणा, आरोग्य यंत्रणा नागरिकांचे संरक्षण करण्यास सज्ज असल्याचे जिल्हाधिकारी रत्नागिरी यांनी सांगितले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular