26.9 C
Ratnagiri
Monday, July 7, 2025

पंढरीच्या विठूरायाला अज्ञात भाविकांकडून सोन्याचा पोषाख भेट…

श्री विठ्ठल रूक्मिणी मातेच्या चरणी नाव न...

वणवा मुक्तीसाठी राज्यात जनजागृती मोहीम – मंत्री उदय सामंत

वणवा लागल्यावर नुकसान भरपाई देण्याचा प्रश्न न...

राज मराठी अस्मितेसाठी; उद्धव खुर्चीसाठी एकत्र – मंत्री उदय सामंत

मराठी भाषेच्या मुद्द्यावरून दोन ठाकरे एकत्र आले;...
HomeKokanकोकण रेल्वेने स्पीड कमी केला वंदे भारत एक्सप्रेसचे काय होणार?

कोकण रेल्वेने स्पीड कमी केला वंदे भारत एक्सप्रेसचे काय होणार?

कोकण रेल्वेने आपल्या गाड्यांचा वेग कमी केल्याने वंदे भारत ट्रेनची हवाच काढून टाकल्याची चर्चा आहे.

कोकण रेल्वेने पावसाळी वेळापत्रक लागू करत गाड्यांचा वेग कमी केल्याने या मार्गावर सुरु होणारी बहुचर्चित वंदे भारत एक्सप्रेसचे भवितव्य काय? ही ट्रेन सुरु होणार की नाही? असे सवाल उपस्थित होत आहेत.

मुंबई ते गोवा दरम्यान प्रवास करणाऱ्या प्रवाशांना विशेषतः कोकणवासियांना वंदे भारत ट्रेनची आतुरता लागून आहे. या मार्गावर हाय स्पीड ट्रेन केव्हा सुरू होते? याकडे कोकणातील प्रवासी विशेष लक्ष ठेवून आहेत. कोकण रेल्वे मार्गावरील मडगाव रेल्वेस्थानकावर गेल्या ३ जून रोजी सकाळी १०.३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते उद्घाटन होणार होत. रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णवी मडगाव स्थानकावर उपस्थित राहणार होते. त्यानंतर ५ जूनपासून ही गाडी प्रवाशांच्या नियमित सेवेसाठी दाखल होणार होती. मात्र ओडिसा येथे रेल्वेचा अपघात झाल्याने वंदे भारत एक्सप्रेसचा शुभारंभ सोहळा रद्द करण्यात आला. आता ही ट्रेन कधी सुरु होणार? याची माहिती कोकण रेल्वे किंवा मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनादेखील नाही. पंतप्रधान कार्यालयाकडे ते बोट दाखवीत आहेत. कोकण रेल्वेने आपल्या गाड्यांचा वेग कमी केल्याने वंदे भारत ट्रेनची हवाच काढून टाकल्याची चर्चा आहे.

RELATED ARTICLES

Most Popular