28.6 C
Ratnagiri
Sunday, December 3, 2023

कोकणात पंधरा टक्के हापूस कलमांना मोहोर

ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात ८५ टक्के झाडांना...

…त्या अधिकारी, सुरक्षा रक्षकांना निलंबित करा, शाश्वत मच्छीमार हक्क संघाची मागणी

दापोली तालुक्यात दाभोळच्या सक्षम् परवाना अधिकारी दीप्ती...

चिपळुणातील कोसळलेले गर्डर हटवण्याच्या हालचाली सुरू

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील बहादूरशेखनाका येथील कोसळलेल्या उड्डाणपुल...
HomeKokanकोकण रेल्वेतील चोऱ्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे, प्रवाशांमध्ये भीती

कोकण रेल्वेतील चोऱ्यांच्या वाढत्या प्रमाणामुळे, प्रवाशांमध्ये भीती

सध्या काळोखाचा फायदा घेत कोकण रेल्वेतील झोपलेल्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरण्याच्या प्रकारात वाढ होवू लागली आहे.

कोरोना काळानंतर कोकण रेल्वेच्या सर्व मार्गावरील गाड्या आत्ता पूर्वीप्रमाणे सुरु झाल्या आहेत. परंतु जशा गाड्यांच्या फेऱ्या वाढल्या आहेत, तशीच चोरी प्रकरणे सुद्धा डोक वर काढायला लागली आहेत. चोर रेल्वे मध्ये चोरी करण्याच्या पद्धती सुद्धा विविध प्रकारच्या शोधून काढत असतात. काही वेळेला खाण्यापिण्यातून गुंगी, झोपलेले असताना सामान पळवणे, मोबाईल चोरून ट्रेन मधून उडी मारून जने असे एक ना अनेक प्रकार घडत असतात.

सध्या काळोखाचा फायदा घेत कोकण रेल्वेतील झोपलेल्या प्रवाशांच्या मौल्यवान वस्तू चोरण्याच्या प्रकारात वाढ होवू लागली आहे. या चोरीच्या प्रकारात वाढ होत असल्याने प्रवाशांकडून चिंता व्यक्त होवू लागली आहे. भावनगर कोचिवली एक्स्प्रेसमधून प्रवास करणारे प्रवासी विलियत युरूकश वासुदेव भाई, नवीन राय व प्रणिता गावडे हे रेल्वेमध्ये झोपलेले असता रोहा ते चिपळूण स्थानकाच्या दरम्याने त्यांच्या ताब्यातील पाच मोबाईल, रोख रक्कम व साहित्य चोरून नेण्यात आले होते. जेंव्हा प्रवाशांना जाग आली त्यावेळी त्यांच्या जवळील मौल्यवान वस्तू आणि साहित्य गायब झालेले त्यांना निदर्शनास आले.

या प्रकरणी मुस्तफा सय्यद या आरोपीविरूद्ध गुन्हा दाखल करण्ययात आला आहे. असाच प्रकार ४ मार्च रोजी घडला असून फिर्यादी मोहमद अजिम शेख रा. सानपाडा, मुंबई हे मत्स्यगंधा गाडीतून प्रवास करीत असताना अंजनी रेल्वेस्टेशन येथे रेल्वे क्रॉसिंगला थांबली असता अज्ञात चोरट्याने खिडकीतून हात घालून पर्स लांबविली. त्यामध्ये सोन्याचा हार, मोबाईल असा पंचवीस हजार रुपयांचा माल अज्ञात चोरट्याने चोरून नेला. त्यामुळे अशा चोरांबाद्द्ल प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

RELATED ARTICLES

Most Popular