20.8 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeKokanकोकण रेल्वेकडून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, लाखात दंड वसूल

कोकण रेल्वेकडून विना तिकीट प्रवास करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई, लाखात दंड वसूल

सध्या अधिक प्रमाणात उद्धभवणाऱ्या गर्दीमुळे टीसी देखील वाद न घालत बसता, दंड ठोठवून तिकीट आणि विना तिकीट चढल्याची रक्कम वसूल करून विषय संपवतात.

कोकणात येण्यासाठी कोकण रेल्वे सारखा आल्हाददायी प्रवास कोणता नाही. परंतु, कायम ट्रेनला असलेली गर्दी लक्षात घेता, कित्येक वेळा तिकीट देखील मिळत नाही. त्यामुळे काही जण विना तिकीटाचाच प्रवास करतात तर काही प्रामाणिकपणे ट्रेनमधील टीसीकडून दंड आणि तिकीट रक्कम देऊन प्रवास करणे योग्य समजतात. सध्या अधिक प्रमाणात उद्धभवणाऱ्या गर्दीमुळे टीसी देखील वाद न घालत बसता, दंड ठोठवून तिकीट आणि विना तिकीट चढल्याची रक्कम वसूल करून विषय संपवतात.

रेल्वे प्रशासन देखील आता कोकण रेल्वे मार्गावर विना तिकिट प्रवास करणार्‍यां विरोधात कडक झाले असून, असे कोणी सापडले तर त्यांच्यावर त्वरित कारवाईचा बडगा उगारण्यात येत आहे. मागील एका महिन्यात कोकण रेल्वेच्या तिकिट तपासनीसांनी ५५ लाख ९९ हजार रुपये केवळ दंड म्हणून वसूल केला आहे.

कोरोनामुळे गेली दोन वर्षे कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक बर्याच प्रमाणात बंदच होती. दुसर्‍या लाटेमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी झाल्यानंतर ठराविक गाड्याच सोडण्यात येत होत्या. यंदाच्या वर्षीपासून तिसऱ्या लाटेचा धोका टळल्यापासून, कोकण रेल्वे मार्गावरील वाहतूक सुरळीत होऊ लागली आहे. गर्दी आणि सोशल डिस्टन्सिंगसाठी जनरल डबे जोडले जात नव्हते. आती पुन्हा ती व्यवस्था केली जात आहे; परंतु एसटी वाहतूकीचा वेमुडत संप सुरु असल्याने बहूतांश भार हा कोकण रेल्वेवर पडला आहे.

मुंबईहून कोकणात येणारा प्रवासीवर्ग रेल्वेचा आधार घेतो. त्यामुळे सर्वच गाड्यांची आरक्षण यादी वाढते. ऑनलाईन तिकीट कन्फर्म झाले नाही, तर ते रद्द होते. अशावेळी काही प्रवासी विनातिकिट डब्यात चढून प्रवास करत असल्याचे प्रकार पुढे आले आहेत. गर्दीचा फायदा घेऊन विनातिकिट प्रवास करणार्‍या विरोधात कोकण रेल्वेने कारवाईला सुरवात केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular