28 C
Ratnagiri
Thursday, March 13, 2025

चिपळूण – कऱ्हाड रेल्वेमार्गाचे स्वप्न अधांतरीच, खासदार तटकरे यांचे आश्वासनही हवेत

राज्याच्या अर्थसंकल्पात चिपळूण-कऱ्हाड रेल्वेमार्गासाठी आर्थिक तरतूद करण्यात...

राजापूर तालुक्यात डॉक्टर नियुक्तीमधील धरसोडीमुळे संताप

प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये एमबीबीएस डॉक्टर नसताना कंत्राटी...
HomeKhedकोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने डबे वाढविले

कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेने डबे वाढविले

मुंबई-मडगाव ०११५१ आणि मुंबई- सावंतवाडी रोड ०११७१ या दोन्ही स्पेशल रेल्वेगाड्यांचे प्रत्येकी दोन डबे वाढवण्याचा निर्णय घेतला.

गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. मुंबईहून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता मुंबई-मडगाव ०११५१ आणि मुंबई- सावंतवाडी रोड ०११७१ या दोन्ही स्पेशल रेल्वेगाड्यांचे प्रत्येकी दोन डबे वाढवण्याचा निर्णय कोकण रेल्वेकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे या दोन्ही रेल्वेंना अतिरिक्त डबे जोडण्यात आल्याने बुकिंगला वेटिंगवर असणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी यापूर्वीच रेल्वेकडून जादा फेऱ्या वाढवण्यात आल्या आहे.

त्यामुळं आता कोणत्याही गर्दी आणि वर्दळी शिवाय चाकरमान्यांना कोकणात जाता येणार आहे. रेल्वेचे डबे वाढवण्यात आल्याने गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना वाढीव आसनांचा लाभ मिळणार मिळणार आहे. अनेकांचे बुकिंग कन्फर्म झालं आहे. परंतु ज्या लोकांचे बुकिंग कन्फर्म झालेलं नाही, अशा लोकांसाठीच डब्यांची संख्या वाढवण्यात आली आहे. त्यामुळं तिकीट तपासून पुढील नियोजनाला सुरुवात करण्याचं आवाहन रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे.

RELATED ARTICLES

Most Popular