27.7 C
Ratnagiri
Saturday, July 12, 2025

शेती संरक्षणासाठी हवे विमा कवच – कृषी विभाग

नैसर्गिक आपत्ती, कीड वा रोगासारख्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये...

गडनरळ ग्रामस्थ ‘वाटद’बाबत सकारात्मक

वाटद एमआयडीसी जमीन भूसंपादनाबाबत आज वैयक्तिक हरकतींवरील...

रत्नागिरीनजीक मिऱ्या येतील उधाणात वाहून जाणाऱ्यास जीवदान

शहराजवळील मिऱ्या समुद्रकिनारी मोठी दुर्घटना होता होता...
HomeRatnagiriरघुवीर घाटात पर्यटक दाखल

रघुवीर घाटात पर्यटक दाखल

कोकण आणि कोकणाचा पाऊस हे एक वेगळच समीकरण आहे. पहिल्या पडणाऱ्या पावसाचा आनंद लुटायला सर्वानाच आवडते, काही असतील त्याला अपवाद. पण कोकण, पहिला पाऊस, धबधबा, गरमागरम वाफाळता चहा, कुरकुरीत कांदा भजी, निखाऱ्यांवर भाजेलेले मक्याचे कणीस म्हणजे स्वर्गसुख.

सध्या कोरोना महामारी, संचारबंदी, वर्क फ्रॉम होम, ऑनलाईन अभ्यासक्रम या सगळ्यापासून कुठेतरी निवांत क्षण मिळावा असे सर्वाना वाटत असते. रत्नागिरी सध्या अनलॉकच्या चौथ्या टप्प्यामध्ये काही प्रमाणात उघडण्यात आली आहे. शनिवार रविवार असणारा विकेंड, त्यामध्ये धो धो कोसळणारा पाऊस म्हटल्यावर प्रत्येक कोकणवासियांची पाऊले हि आपसूकच डोंगर, धबधबे याकडे वळतात. दोन महिन्यांनंतरच्या अनलॉकमुळे अनेक पर्यटक रत्नागिरीतील खेड तालुक्यातील रघुवीर घाटामध्ये पावसाचे मनमोहक सौंदर्य याची देही याची डोळा अनुभवायला दाखल झाले.

रत्नागिरी आणि साताऱ्याला जोडणारा कोयना अभयारण्य आणि सह्याद्री व्याघ्र प्रकल्पामध्ये असलेला हा रघुवीर घाट खूप प्रसिद्ध आहे. घाटातील पावसामुळे ठिकठिकाणी तयार झालेले धबधबे, सर्वत्र पसरलेली हिरवळ आणी त्यामधून हे फेसाळलेले धबधबे यांचे दृश्य डोळ्याचे पारणे फेडणारे होते. १३ जून संध्याकाळपासून रघुवीर घाटामध्ये पर्यटकांनी गर्दी करायला सुरुवात केली होती.

परंतु, जिल्ह्यामध्ये कलम १४४ लागू असल्याने, जमावबंदी करण्याला मनाई असल्याने, पोलीस यंत्रणेला खबर मिळाल्यावर घटनास्थळी जाऊन त्यांनी पर्यटकांना घरी माघारी जाण्यास सांगितले. जिल्ह्यात संचारबंदी असताना आणि स्थानिक प्रशासन कोरोना संक्रमण कमी करण्यासाठी उपाययोजना राबवत असताना, अशा प्रकारची गर्दी होणे म्हणजे कोरोना वाढण्याला निमंत्रण देण्यासारखे आहे. त्यामुळे पोलिसांनी वेळीच घटनास्थळी जाऊन पर्यटकांची गर्दी पांगवली.

RELATED ARTICLES

Most Popular