25.7 C
Ratnagiri
Thursday, October 24, 2024

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई- गोवा बनावटीच्या मद्यासह कोटीचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी, दि. २३ (जिमाका)- मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर...

या खेळाडूच्या टीम इंडियात पुनरागमनाचे भवितव्य काय…

भारत विरुद्ध न्यूझीलंड पुणे कसोटी आता जवळ...
HomeKhedरघुवीर घाटात दरडी कोसळणे सुरुच, घाटातील कामासाठी ६ कोटींची तरतूद

रघुवीर घाटात दरडी कोसळणे सुरुच, घाटातील कामासाठी ६ कोटींची तरतूद

घाटामुळे कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थांचा खेड तालुक्याशी थेट संपर्क प्रस्थापित झाला.

वाहतूक एकेरी सुरू मात्र दरडीचा धोका कायम सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्याला जोडणारा रघुवीर घाट रत्नागिरी जिल्ह्यातील लोकप्रिय पर्यटन क्षेत्र म्हणून प्रसिद्ध असून तेथे सातत्याने दरडी कोसळत असल्याने पर्यटकांचा खोळंबा होतो. खेड मधील रघुवीर घाटात पहिल्याच पावसामध्ये तीन ठिकाणी दरड रस्त्यावर आली होती. किरकोळ प्रमाणात जरी दरड कोसळली असली तरी वाहतुकीवर याचा परिणाम झाला. अकेरी मार्गे या घाटातून वाहतूक सुरू आहे. मात्र पावसाचा जोर वाढल्यास मोठ्या प्रमाणावरती दरड कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दरवर्षी दरड कोसळण्याच्या भीतीमुळे हा घाट पावसाळ्यात बंद असतो रघुवीर घाट हा रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रिय पर्यटन क्षेत्र आहे मात्र दरड कोसळण्याच्या घटनांमुळे हा घाट धोकादायक झाला आहे. रत्नागिरी व सातारा जिल्ह्याला जोडणाऱ्या रघुवीर घाटात दरडी कोसळणे, दरीच्या बाजूने रस्ता खचणे या सारख्या प्रकारांमुळे प्रवास आणि पर्यटन धोकादायक बनले होते. मात्र, खेड सार्वजनिक बांधकाम विभागाने यावर्षी सुमारे ६ कोटी खर्च करून संरक्षक कठडे, नवीन मोऱ्यांची उभारणी केली आहे. त्यामुळे यावर्षी रघुवीर घाटातील प्रवास व पर्यटन सुरक्षित झाले आहे.

खेड तालुक्यातील खोपी गावातून रघुवीर घाट जातो. या घाटामुळे कांदाटी खोऱ्यातील ग्रामस्थांचा खेड तालुक्याशी थेट संपर्क प्रस्थापित झाला. या मार्गावर खेड-उचाट अकल्पे ही बसफेरी २००२ सालापासून सुरू करण्यात आली. गेल्या काही वर्षात रघुवीर घाटात पावसाळ्यात दरडी कोसळण्याचे प्रकार सुरू झाल्याने वाहतूक बंद करावी लागत होती. यावर्षी सार्वजनिक बांधकाम विभागाने रघुवीर घाटात संरक्षणाच्या दृष्टीने कामे हाती घेतली होती. घाटातील धबधब्यांच्या पाण्यामुळे रस्त्यावर पाण्याची डबकी तयार होऊन रस्ता वाहतुकीस धोकादायक होतो. घाटातील अशा धोकादायक ४ ठिकाणी नवीन मोऱ्या बांधण्यात आल्या आहेत.

यामुळे रस्ता खचून किंबा दगड, माती रस्त्यावर येऊन वाहतुकीस अडथळा निर्माण होण्याचे प्रमाण कमी होणार आहे. घाटात २०० मीटर लांबीची आरसीसी गटारे बांधण्यात आली आहेत. घाटात दरीच्या बाजूने रस्ता खचण्याचे प्रमाण वाढले होते. यामुळे अरुंद रस्त्यावरून धोकादायक पद्धतीने वाहतूक करावी लागत होती. बांधकाम विभागाने अशा २० ठिकाणी संरक्षक भिंती उभारून रस्ता मजबूत व रुंद केला आहे. तसेच घाटात धोकादायक ठिकाणी नादुरुस्त झालेले संरक्षण कठडे उभारण्यात आले आहेत. या कामांमुळे हा घाट आता सुरक्षित झाला आहे.

विभागाची सज्जता – तरीही घाटात कुठलीही नैसर्गिक आपत्ती उद्भवून अडथळे निर्माण झाल्यास तातडीने दूर करण्याची सज्जता ठेवण्यात आल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रशासनाने दिली आहे.

पर्यटनाची संधी? – पावसाळ्यात दरवर्षी रघुवीर घाटात पर्यटकांची संख्या वाढते. मात्र, पावसाळ्यात दरडी कोसळण्याचा धोका कायम राहिल्याने गेली दोन वर्ष हा घाट पर्यटनासाठी प्रशासनाकडून बंद करण्यात येत होता

RELATED ARTICLES

Most Popular