26.4 C
Ratnagiri
Monday, December 9, 2024

Huawei च्या Mate 70 मालिकेला प्रचंड मागणी, 67 लाखांहून अधिक युनिट्सचे बुकिंग

चीनी स्मार्टफोन निर्माता Huawei ने गेल्या महिन्यात...

शाहीद कपूरसोबत नॅशनल क्रश तृप्ती डिमरी झळकणार एका नव्या चित्रपटात

तृप्ती डिमरीचा यशस्वी प्रवास - तृप्ती डिमरीने...

IND vs AUS दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाचा लाजिरवाणा पराभव

ॲडलेडमध्ये खेळल्या गेलेल्या पिंक बॉल कसोटी सामन्यात...
HomeDapoliखा सुनिल तटकरेंच्या विजयात आमचाही खारीचा वाटाः आ. योगेश कदम

खा सुनिल तटकरेंच्या विजयात आमचाही खारीचा वाटाः आ. योगेश कदम

दापोली विधानसभा मतदार संघातून तटकरे पिछाडीवर राहीले.

खासदार सुनिल तटकरे यांच्या विजयात दापोली विधासभा मतदार संघाचा सिंहाचा नसला तरी खारीचा वाटा असल्याचे रोखठोक प्रतिपादन आमदार योगेश कदम यांनी दापोलीत बोलताना व्यक्त केले. रायगड लोकसभा मतदार संघातून महायुतीचे उमेदवार म्हणून सुनिल तटकरे यांनी निवडणुक लढविली. आणि ते खासदार म्हणून निवडून आले. मात्र दापोली विधानसभा मतदार संघातून तटकरे पिछाडीवर राहीले. खा सुनिल तटकरेंच्या विजयात आमचाही खारीचा वाटा आ. योगेश कदम तटकरें यांना अपेक्षित असे मताधिक्य देता आले नाही त्याला अनेक कारणे असल्याचे योगेश कदम यांनी सांगितले.

दापोली शहरातील फाटक कॅपिटल सभागृहात महायुतीचे पदाधिकारी व मतदारांचे जाहीर आभार मानण्यासाठीच्या आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना व्यक्त करत खासदार सुनिल तटकरे हे दापोली विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांना प्राधान्य देवून केंद्र सरकारच्या जनहिताच्या योजना राबविण्यात कमी पडणार नाहीत असा आशावाद व्यक्त केला.

यावेळी व्यासपीठावर खास. सुनिल तटकरे, राज्याचे उदयोग मंत्री आणि जिल्हयाचे पालकमंत्री उदय सामंत, भाजपाचे जिल्हाध्यक्ष केदार साठे, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बाबाजीराव जाधव, आरपीआयचे प्रितम रूके, शिवसेनेचे तालुका प्रमुख उन्मेश राजे, राष्ट्रवादीचे अजयशेठ बिरवटकर, संदिप राजपूरे, दौलत पोस्टूरे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला जिल्हाध्यक्षा साधना बोत्रे, मंडणगड तालुकाध्यक्ष मुझफ्पर मुकादम, भाजपाचे तालुका अध्यक्ष संजय सावंत, चिपळूणचे जयेंद्र खताते, स.तु.कदम, सचिन जाधव, निलेश शेठ, जालगाव सरपंच अक्षय फाटक, नेहा जाधव, युवराज जाधव, रमा बेलोसे, विनीता शिगवण, मधुकर दळवी, राजेंद्र पेटकर, विजय मुंगसे, राकेश उर्फ पिंटया माने, भाजपाच्या जया साळवी आदींसह महायुतीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर विजयर्थी झालेले उमेदवार खासदार सुनिल तटकरे हे मतदारांचे ऋण व्यक्त करण्यासाठी पहिल्यांदाच दापोलीत आले होते. यावेळी सुनिल तटकरें यांचे फुलांची उधळया करून वाजत गाजत फटाक्याच आतशबाजी करत जंगी स्वाग करण्यात आले.

RELATED ARTICLES

Most Popular