27.9 C
Ratnagiri
Tuesday, February 7, 2023

पालशेतच्या समुद्रकिनाऱ्यावर सागरी साहसी खेळांची सुविधा उपलब्ध

नवीन वर्षाचे स्वागत आणि कोकण किनारपट्टी एक...

बागायतदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकदिवशीय धरणे आंदोलन

कोरोनाचे संकट, त्यानंतर चक्रीवादळ अशा नैसर्गिक दुष्टचक्रामध्ये...

नववर्षाच्या स्वागतासाठी पोलीस यंत्रणा सक्रीय

सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे...
HomeRatnagiriलांजा शेट्येवाडीमधील ग्रामस्थ रस्त्याच्या खोदकामामुळे त्रस्त, आंदोलन छेडण्याचा इशारा

लांजा शेट्येवाडीमधील ग्रामस्थ रस्त्याच्या खोदकामामुळे त्रस्त, आंदोलन छेडण्याचा इशारा

हा रस्ता वाहतूक योग्य करून द्यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शेट्येवाडी येथील स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मागील सहा महिन्यापासून रस्त्यांच्या डागडुजीची कामे सुरूच आहेत. अनेकदा रस्ता पूर्ण झाल्यावर पुन्हा रस्ते खोदून पाण्याच्या पाईप लाईन अथवा अंतर्गत विजेची जोडणी करण्यासाठी पूर्ण बनलेला रस्ता ठेकेदाराकडून खोदला जात आहे. त्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

लांजा शहरातील शेट्येवाडी येथे सुद्धा अशीच घटना घडली आहे. पाण्याच्या पाईप लाईनसाठी नव्याने डांबरीकरण केलेला रस्ता जेसीबीने खोदल्याने १४ लाख १८ हजार ९६२ रुपयांचा खर्च वाया गेल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. या बरोबरच रस्ता खोदकामामुळे संपूर्ण रस्ता वाहतुकीसाठी धोकादायक बनला असून लोकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. त्यामुळे हा रस्ता वाहतूक योग्य करून द्यावा अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा शेट्येवाडी येथील स्थानिक नागरिकांनी दिला आहे.

याबाबत नगरपंचायतीला दिलेल्या निवेदनात शेट्येवाडी येथील नागरिकांनी म्हटले आहे की, लांजा नगरपंचायती मार्फत प्रभाग क्रमांक ४ मधील बौद्धवाडी पर्यंत पाण्याची नवीन पाइपलाइन टाकण्यासाठी शेट्येवाडी तसेच शेटयेवाडी-बौद्धवाडी हे रस्ते जेसीबीने खोदकाम करून पाईप लाईन टाकली आहे. त्यापैकी शेटयेवाडी ते बौद्धवाडी या रस्त्याचे नवीनच डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र खोदकाम जेसीबी यंत्रणेने केल्यामुळे १४ लाख १८ हजार ९६२ रुपयांची रक्कम वाया गेली आहे.

सद्यस्थितीत या रस्त्यावर खोदकामामुळे मातीचे थर जमा झाले आहेत व रस्ता व रहदारीसाठी धोकादायक झाला आहे. पावसाळ्यात तर सदर रस्ता चिखलमय होऊन रहदारीसाठी धोकादायक होण्याची दाट शक्यता आहे. या रस्त्यावरून लहान मुले, शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी,  वृद्ध नागरिक, आजारी व्यक्ती, महिला यांची सतत रहदारी सुरु असते. पावसाळ्यात सदर रस्ता चिखलमय होवून तो धोकादायक होणार आहे. त्यामुळे काही दुर्घटना होऊन शारीरिक इजा किंवा तत्सम हानी झाली तर त्याला सर्वस्वी नगरपंचायत जबाबदार असेल असा इशारा येथील नागरिकांच्यावतीने देण्यात आला आहे.

त्यामुळे याबाबत तातडीने कार्यवाही करण्यात यावी. तसेच खोदकाम करण्यात आलेल्या रस्त्याचे पुन्हा एकदा डांबरीकरण करून द्यावे अशी मागणी शेट्येवाडी येथील ग्रामस्थ नितीन शेट्ये, मनोहर शेट्ये, सुधाकर शेट्ये, अशोक शेट्ये, देवदत्त शेट्ये, शैला शेट्ये यांच्यासह अन्य नागरिकांनी केली आहे.

RELATED ARTICLES

Most Popular