25.8 C
Ratnagiri
Saturday, September 14, 2024

‘तुंबाड’च्या रि-रिलीजने केले मालामाल, आता चित्रपटाचा सिक्वेल होणार का?

अविनाश तिवारी आणि तृप्ती डिमरी स्टारर 'लैला-मजनू'...

हंगाम सुरू होऊन महिना झाला तरीही मासे कमीच

पावसाळी दोन महिन्यांच्या बंदीनंतर मासेमारी सुरू झाली...

शेतकरी, मच्छीमार, पर्यटन उद्योजकांच्या आंदोलनाला रत्नागिरीत मोठा प्रतिसाद

जाकादेवी रत्नागिरी येथील शेतकरी आंदोलन स्वराज्य भूमी...
HomeMaharashtraप्रशासन फक्त अल्टीमेटम देतंय आणि कारवाई करत नाही हा समज दूर करणार...

प्रशासन फक्त अल्टीमेटम देतंय आणि कारवाई करत नाही हा समज दूर करणार – परिवहनमंत्री

अनिल परब यांनी आपण कर्मचाऱ्यांवरील कारवाईवर ठाम असल्याची माहिती दिली आहे.

एसटी कर्मचाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली मुदत आज संपली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज परिवहन मंत्री अनिल परब यांनी कारवाई होणार कि नाही ? याबाबतची स्पष्ट माहिती दिली आहे. अनिल परब यांनी आपण कर्मचाऱ्यांवरील कारवाईवर ठाम असल्याची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलंय की,  याआधी संपकरी कर्मचार्यांना सात वेळा तरी अल्टीमेटम देऊन झाला आहे. मात्र, प्रशासन फक्त अल्टीमेटम देतंय आणि कारवाई करणार नाही, असा त्यांचा समज झाला आहे. त्यामुळे आत्ता हा गैरसमज दूर करण्याची वेळ आली आहे.

राज्यातील सर्व कर्मचारी काल रात्री अखेर पर्यंत जे कर्मचारी कामावर येणार नाहीत, त्यांच्यावर नक्कीच कडक कारवाई होणार आहे. यामध्ये त्यांचं निलंबन असेल, बडतर्फी असेल किंवा सेवासमाप्ती यापैकी एक असेल अशी माहिती दिली गेली.

पुढे बोलताना ते म्हणाले की, सध्या पाच हजार बसेस सुरु झाल्या आहेत. आधी बारा हजार सुरु होत्या. पण आता उपलब्ध कर्मचाऱ्यांसह आम्ही काम सुरु करणार आहे. या शिवाय अकरा हजार कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती आम्ही करतो आहोत. त्यामुळे कंत्राटी कामगारांसोबत आम्ही कामकाज सुरु करणार आहोत. कोरोना आणि या संपामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक तोट्यात गेली असल्याने, अजून एसटीची अवस्था डबघाईला नेण्याचा इरादा कर्मचाऱ्यांचा दिसतो आहे.

तसेच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर आजपासून कारवाई करणार आहोत. आजपासून जे कामावर हजर होणार नाहीत,  त्यांना नोकरीची गरज नाही, असच दिसून येत आहे. त्याचप्रमाणे जे मागील पाच महिने संपत सहभागी असून, कामावर हजर झाले नाहीत. ते कोणतंही कारण न देता गैरहजर आहेत, त्यामुळे ते शिक्षेस पात्र आहेत. म्हणून आम्ही ही कडक कारवाई करणार आहोत.

RELATED ARTICLES

Most Popular