26.9 C
Ratnagiri
Wednesday, October 30, 2024
HomeKhedकशेडी बोगद्यात पुन्हा गळती धोकादायक स्थिती…

कशेडी बोगद्यात पुन्हा गळती धोकादायक स्थिती…

या बोगद्यात सिमेंटच्या छताला गळती लागली आहे.

मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याला लागलेली गळती काढण्याचा प्रयत्न काही दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाने केला होता; परंतु बुधवारी पुन्हा या बोगद्यातून दोन ते तीन ठिकाणी मोठ्या प्रमाणात गळती लागली आहे. खेडकडील बोगद्याच्या प्रवेशद्वाराजवळ शंभर मीटरच्या अंतरात मोठी गळती सुरू आहे. बोगद्यात शिरताच दुचाकी व चारचाकी वाहनचालक या पाण्याच्या फवाऱ्याने भिजत आहेत. या ठिकाणी पाणी रस्त्यावर येऊ नये म्हणून प्लास्टिकचा वापर केल्याचे निदर्शनास आले. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्यातील एका मार्गिकेतून लहान वाहनांसाठी मुंबई व गोव्याच्या दिशेला जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.

त्यामुळे प्रवासाचा कालावधी कमी झाला आहे. या बोगद्यात सिमेंटच्या छताला गळती लागली आहे. हा प्रकार अतिशय धोकादायक असून, ही बाब सर्वच माध्यमांनी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर बांधकाम विभागाने तज्ज्ञांचा सल्ला घेत गळती लागलेल्या ठिकाणी सिमेंट भरले होते. कशेडी बोगद्यातून मोठ्या प्रमाणात गळणारे पाणी रोखण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग बांधकाम विभागाच्या ठेकेदार व अभियंत्यांनी केलेल्या उपाययोजना कुचकामी ठरल्या आहेत, असेच चित्र आहे.

RELATED ARTICLES

Most Popular